पान:रामायणनिरीक्षण.pdf/५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

रामायणनिरीक्षण. पापनालय, ४९ 201 सांगून ९३ लोकाच्या अखेरपर्यंत नारद रामाच्या राज्याचें वर्णन करीत आहे. यात काही वर्तमानकालीन व कांहीं भविष्यकालीन प्रयोग आढळतात. नंतर भविष्यत्का- लीन प्रयोगांचे खालील लोक आहेत:-- अश्वमेधशतैरिट्वा यथा बहुसुवर्णकैः ॥ ९४ ॥ राजवंशान् शतगुणान् स्थापयिष्यति राघवः | चातुर्वर्ण्य च लोकेऽस्मिन् स्वे स्वे धर्मे नियोक्ष्यति ।। ९६॥ दशवर्षसहस्राणि दशवर्षशतानि च ॥ रामो राज्यनुपासित्वा ब्रह्मलोकं प्रयास्यति ॥ ९७ ॥ यावरून नारदानें हें संक्षिप्त रामचरित्र, राम अयोध्येस येऊन अभिषित झाल्यानंतर- - पण त्यानें अश्वमेवादि यज्ञ करण्याच्या पूर्वी वाल्मीकीस सांगितलें हैं कळून येईल. रामानें एवढा मोठा पराक्रम करून परत स्वजनांत व स्वराष्ट्रांत आल्या- नंतरच (त्याच्या कालकाचा मुखी लाभ लोकांस होत असतां) त्याविषयीं लोकांत जिज्ञासा व कुतूहल उत्पन्न व्हावीत हें साहजिक आहे. तेव्हां, नारदानें वाल्मीकीस रामायणाचें घरील बीज सांगितले तेव्हां राम पुनः राज्यारूढ होऊन जिकडे तिकडे शांतता नांदत होती, असे कळून येईल. यावेळी अजून रामानें सीतेचा त्याग वाल्मीकीच्या आश्रमाजवळ केला होता किंवा नाहीं, हें कळण्यास साधन नाहीं. तथापि, रामानें अझून अश्वमेधयज्ञास सुरवात केली नव्हती, येवढी पत्र गोष्ट खास ! याचे कारण ओघानें पुढें कळेलच ! वाल्मीकीनें हें संक्षिप्त रामचरित्र नारदाकडून ऐकिलें, त्यावेळी १ हे नारदाचे श्लोकच वाल्मीकीच्या सभविष्य उत्तरकांडाचे वीजभूत होत. यांत राजवंश स्थापन करील असा उल्लेख आहे.