पान:रामायणनिरीक्षण.pdf/५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण ६ वें. -- " वाल्मीकीला प्रथम रामाविषयीं हकीकत माहीत होती किंवा नाहीं, हे सांगणे कठिण आहे. बालकांडाच्या प्रारंभी वाल्मीकिऋषीनें नार- दास जो प्रश्न केला आहे तो फक्त असा आहे :- कोन्वस्मिन् सांप्रतं लोके गुणवान् कश्च वीर्यवान् । धर्मज्ञश्च कृतज्ञश्च सत्यवाक्यो दृढव्रतः ॥ १.१.२.॥ यावरून " सध्याच्या काळीं, हे नारदा, जे राजे आहेत, त्यापैकी कोण गुणवान्, वीर्यवान्, वर्मज्ञ, कृतज्ञ, सत्यज्ञ, इत्यादि गुप्पांनीं युक्त " आहे ? एवढाच बाल्मीकीचा प्रश्न आहे, असे कळून येईल. तत्कालीन राजांपैकी कोण श्रेष्ठ आहे ? असा प्रश्न केल्यानें रामाविषयीं वाल्मीकीला पूर्वी कांहींच हकीकत माहीत नव्हती, असे सिद्ध होत नाहीं. क्षणभर आपण असे जरी गृहीत धरिलें, की नार- दास प्रश्न विचारीपर्यंत वाल्मीकीला रामाविषयीं कांहींच माहिती नव्हती, तरी सांप्रतं हा शब्द वाल्मीकीचें व नारदाचें रामाशी समकालीनत्वच दाखवितों. येवढे एकदां लक्षांत आल्यानंतर, रामाच्या आयुःक्रमांतील कोणत्या भागांत वाल्मीकीनें नारदास हा प्रश्न केलेला असावा व नारदानें संक्षिप्त रामचरित्र वाल्मीकीस निवेदन केले असावें, हें ही शोधून काढणें शक्य आहे, हे वाचकांस कळण्याजोगे आहे. या प्रश्नाचा उलगडा होण्यास नारदाच्या संक्षिप्त रामचरित्राचें सूक्ष्मपणें निरीक्षण करणे जरूर आहे. नारद कोणत्या - वेंळीं तें वाल्मीकीस सांगत आहे, हे त्यांतील भूत व भविष्यका- ळच्या प्रयोगांवरून जाणण्याजोगे आहे. जसें:- ४८ नारदानें रामाची हकीकत सांगतेवेळी ८९ व्या श्लोकापर्यंत भूत काळाचा प्रयोग केलेला आहे. त्यापैकीं शेवटचा श्लोकार्घ असा आहे: टी रामः सीतापनुप्राप्य राज्यं पुनरवाप्तवान् ॥ ८९ ॥ , त्या