पान:रामायणनिरीक्षण.pdf/५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

रामायणनिरीक्षण. प्रकरण ६ वें. वाल्मीकिऋषि व त्याचे ग्रंथ, -0 वाल्मीकि हा ऋषि असून त्याच्या हातून तत्कालीन इतिहासावर एक विलक्षण व अद्भुत ग्रंथ निर्माण झालेला आहे, ही मोठ्या अभिमानाची गोष्ट आहे. वाल्मीकीनें जर रामाची हकीकत जगास सादर केली नसती, तर रामाविषयीं आज काय इतिहास मिळाला असता? वाल्मीकीला काव्य रजण्याची स्फूर्ति क्रौंचवधाने झाली; तेव्हां त्या क्रौंचवधाच्या योगानें त्या व्याधानेंही जगावर उपकार करून ठेविले आहेत असें ह्मणण्यास हरकत नाहीं. आजपर्यंत प्रायः सर्व भारतीयांची अशीच समजूत आहे वाल्मीकि हा रामाचा ग्रंथांत समकालीन ( अत एव रामाइतकाच प्राचीन ) होता. या समजा- च्या विरुद्ध प्रत्यक्ष रामायणांत किंवा दुसऱ्या कोणत्याही कांही तरी पुरावा मिळत आहे की काय हे पाहून वाल्मीकि रामाचा समकालीन होता किंवा नाहीं हें एकदाचें ठरवून टाकणें जरूर होऊन बसले आहे. अलीकडे रा. ब. वैद्य यांनीं रामायणावर लिहिलेल्या नव्या पुस्तकांत याविषयीं विनाकारण शंका दाखविलेली आहे. (पृष्ठ ६ The Riddle of the Ramayana पहा ) रा. वैद्यांसारख्या सूक्ष्म निरीक्षकास ज्या प्रश्नाविषयीं शंका वाटत आहे, त्या प्रश्नाचा एकदा समाधानकारक निकाल लावणे अत्यंत जरूर आहे. वाल्मीकि हा तैत्तरीय प्रातिशाख्यांत व वाजसनेयी संहितेंत आढळणारा एक जुना ऋषि आहे; व भारतांत त्याचे नांव मोठ्या सन्मानाने वारंवार उल्लेखिलें जातें. यावरून तो प्राचीन पूज्य ऋषि होता, ह्यांत तर शंकाच नाहीं; पण मुख्य प्रश्न असा आहे कीं, तो रामाचा समकालीन होता किंवा नाहीं ? यापुढें आपण याच प्रश्नाचा विचार करूं. ४७