पान:रामायणनिरीक्षण.pdf/५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मकरण ५ वें. जरूर नांहीं काय ? ज्याप्रमाणें भारतीय कथेस अडथळा येईल ह्मणून कृष्णचरित्ररूप हरिवंश हा खिलरूप ग्रंथ करून वैशंपायना- नेंच भारतास जोडला, तद्वत्च रामकथेच्या अनुसंधानांत व्यत्यय येईल झणून, वाल्मीकीनें राक्षसाची परंपरा व रावणाची हकीकत ही एकी- कडे राखून ठेऊन तिचें खिलरूप उत्तरकांड केलें. शिवाय, रामा- विषयीं वाचकांची जिज्ञासाही पहिल्या सहाच कांडांत तृप्त होत नाहीं; राज्याभिषेकानंतर रामाचें काय झालें, रामायण पाठ ह्मणणारी कुश व लव हीं मुले कशीं व कुठें झालीं- इत्यादि प्रश्नांचा उलगडा करून घेण्याविषयीं वाचकांचें मन कसें उतावीळ होऊन जाते. ही वाचकांची जिज्ञासा कवीस कोठें तरी तृप्त करणें जरूरच होतें; व ती त्यानें उत्तरकांड रचून पूर्ण केली आहे. तथापि कांहीं गोष्टींची पूर्णता यानेही झाली नाही. ती इतर कवीनीं करण्याचा यत्न केला आहे. मूळचें उत्तरकांड आतां तसेच नांहीं. वाल्मीकीनें इतर सहा कांडांबरोबरच मूळचें उत्तरकांडही रचिलें, हें वरील विवेचनानें कळून येईल. पण मूळचें बाकीचें रामायण जसें कायम राहिलें नाहीं, तसेंच उत्तरकांडही आतां वाल्मीकीनें लिहिल्याप्रमाणेंच कांहीं राहिलेलें नाहीं. उत्तरकांडाचें सद्यः स्वरूप अर्वाचीन असले ह्मणून मूळचें उत्तरकांड कांहीं वाल्मीकीनें लिहिलेले नव्हे असे सिद्ध होत नाहीं; ही गोष्ट वाचकांच्या मनास एकदा पटली ह्मणजे किती तरी घोटाळा नाहींसा होतो. -*:-