पान:रामायणनिरीक्षण.pdf/५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

रामायणनिरीक्षण. भक्त्या रामस्य ये चेमां संहितां ऋषिणा कृतां । ये लिखतीह च नराः तेषां वासः त्रिविष्टपे ॥ ११९ ।। यांत, 'पुरा' (पूर्वी ) हा शब्द लक्षांत ठेवण्याजोगा आहे. तसेच या रामायणाला आदिकाव्य ह्मणणाऱ्या पुरुषाने पुढील अनेक लहान मोठीं काव्यें पाहिलीं असली पाहिजेत. असें कुश व लव कसे म्हणणार ? तसेंच, 'ये लिखतीह ' यानें तर अगदीं पकडूनच दिले आहे. कारण, वाल्मीकीनें रामायण इतक्या प्राचीन काळी रचलें कीं त्यावेळी लेखनकला असल्याप्रमाणे दिसत नाहीं; तें वाल्मीकीनें रचून कुशलवांकडून पाठ ह्मणवून घेतलें असें असून ‘ हें जे कोणीं लिहून ठेवतील ' असें ह्मणणें कुशलवांस क् नाहीं; हैं दुसऱ्याच कोणी तरी लेखकानें अलीकडे झटलेले असावें. कतकाच्या वेळेस हे श्लोक नव्हते, यावरून तर हे त्यानंतरचेच श्लोक आहेत हें सिद्धच होतें. हे श्लोक जर तेथें खरोखरच असते तर तेथेंच रामायण संपलें असें वाटण्याजोगें होतें; पण ते श्लोक तेथें खरोखर पूर्वी नव्हते. ( ७ ) आतां उत्तरकांडाशेवटचे दोन श्लोक पाहूं ह्मणजे झालें :- एतावदेतदाख्यानं सोत्तरं ब्रह्मपूजितम् । ४५ रामायणमिति ख्यातं मुख्यं वाल्मीकिना कृतं ॥ १ ॥ एतदाख्यानमायुष्यं सभविष्यं सहोत्तरं । कृतवान् प्रचेतसः पुत्रः तद्ब्रह्मण्यन्वमन्यत ॥ ११ ॥ वरील सर्व अंतर्गत व बहिर्गत पुराव्यावरून पाहतां वाल्मीकीनेंच मूळचें उतरकांड लिहिलें, हें सिद्ध होतें. वरील प्रमाणे नसतीं तरी उत्तरकांडाची आवश्यकता कळून येण्याजोगीच आहे. ज्यानें रामाचा पराक्रम वर्णन केला, त्याला रावणाची हकीकत व परंपरा सांगणे ,