पान:रामायणनिरीक्षण.pdf/५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण ५ वें. चतुर्विंशत्सहस्राणि श्लोकानां उक्तवान् ऋषिः । तथा सर्गशतान् पंच षट्कांडानि तथोत्तरम् || १-४-२ यांत उत्तरकांड ही वाल्मीकीनेंच लिहिलें असें झटले आहे. तसेंच पुढें कृत्वा वै तन्महामाज्ञः सभविष्यं सहोत्तरम् । चिंतयामास कोन्वेतत् प्रयुंजीयादिति प्रभुः ॥ ( ५ ) युद्धकांडाच्या १३० व्या सर्गात, (श्लोक ९४ पासून १०४ पर्यंत ) भरताचा युवराजपदीं अभिषेक केल्यानंतर, जी पुढील हकीकत दिली आहे ती उत्तरकांडांतील कथानकाचा संक्षेप आहे. याविषयीं ‘ रामायणतिलक' नामक टीकेंत रामटीकाकर जे . ह्मणतो तें अगढ़ीं बरोबर आहे :- पौंडरीकाश्वमेधेत्यादिः उत्तरकांडार्थसंक्षेपः । " यावरून युद्धकांड संपवितेवेळींच पुढील कथाभाग वाल्मीकीच्या लक्षांत होता, हँ कळून येतें. ( ६ ) युद्धकांडच्या शेवटीं (अ० १३०) जे श्लोक आहेत ते मूळचे नसावेत असे वाटतें. कारण टीकेंत झटले आहे कीं:- - "" “ अत्र फलश्रुतिश्लोकाः कतक- व्याख्याने नोपलभ्यते । यावरून हे श्लोक कतकटीकाकाराच्या वेळेस या ठाई नव्हते, असे कळते. शिवाय, हे श्लोक नंतर अलिकडेच कोणीतरी लेखकानें रामायण पुस्तकरूपानें लिहून ठेऊं लागल्यानंतरच घातले आहेत, असें आंतील मजकुरावरूनही कळतें:- - आदिकाव्यमिदं चार्ष पुरा वाल्मीकिना कृतम् ॥ १०५ ॥ शृणोति य इदं काव्यं पुरा वाल्मीकिना कृतम् ॥ ११० ॥