पान:रामायणनिरीक्षण.pdf/५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

रामायणनिरीक्षण. पुढें प्रत्येक कांडांत काय काय विषय आहेत हें सांगत असतेवेळी असे श्लोक आहेत:-- उत्तरेष्वृषिसंवादो यज्ञप्रारंभ एव च । तत्रानेका रामकथा शृण्वतां पापनाशकाः ॥ ७९ ॥ चतुर्विंशतिसाहस्रं षट्कांडं परिकल्पितम् । तद्वै रामायणं प्रोक्तं महापातक-नाशनम् ।। ८१ यांत बाल व अयोध्याकांड मिळून एकच कांड धरिलें आहे. बालकांडाच्या अखेरीस भरताचा नंदिग्रामांत बास सांगितला आहे ( पशिष्ट १ लें पहा ). यावरून बाल व अयोध्याकांडे मि- ळून एक मानण्याची एक प्राचीन पद्धत दिसते. १ ( ४ ) येथवर बाहेरचीं प्रमाणें पाहिली. आतां खुद्द वाल्मीकीच्या रामायणांतच याविषयीं कांहीं पुरावा मिळतो की काय, हें आपण पाहूं- नारदान पूर्वी सांगितल्याप्रमाणें वाल्मीकीनें रामाचें चरित्र लिहिलें:- स यथाकथितं पूर्व नारदेन महात्मना । -- रघुवंशस्य चरितं चकार भगवान् मुनिः ॥ १-३-९॥ नंतर या चरित्रांत काय काय विषय आहेत हैं श्लोक १० ते ३९ पर्यंत सांगितलें आहे. त्यांत युद्धकांडांतील शेवटला विषयः-- G रामाभिषेकाभ्युदयं सर्वसैन्यविसर्जनम् ।। १-३-३८ ॥ हा सांगितल्यानंतर पुढें उत्तरकांडांतील विषय आहेत:-- स्वराष्ट्ररंजनं चैव वैदेह्याच विसर्जनम् ॥ ३८ ॥ अनागतं च यत् किंचित् रामस्य वसुधातले । तच्चकारोत्तरे काव्ये वाल्मीकिर्भगवान् ऋषिः ॥ ३९ ॥ बालकांड, अ ३ रा.. तसेंच,