पान:रामायणनिरीक्षण.pdf/५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४२ प्रकरण ५ वें. गर्भितार्थ आहे म्हणजे उत्तरकांडहि वाल्मीकीनेच रचिलें अशी जैमि- नीची तरी समजूत होती, हे यावरून कळून येतें. ( २ ) गर्गसंहिता म्हणून श्रीकृष्णचरित्रपर एक १२००० श्लोकांचा ग्रंथ आहे. तो यादवांचा गुरु जो गर्गाचार्य - त्यानेंच लिहिला आहे. त्यांतील पहिल्या खंडाच्या ४ थ्या अध्यायांत उत्तर कांडांतील कथेचा याप्रमाणे उल्लेख आहे:- अथ रामो वानरेंद्र रावणादीनिशाचरान् । जित्वा लंकामेत्य सीतां पुप्पकेण पुरीं ययौ ॥ ५९ ॥ सीतां तत्याज राजेंद्रो बने लोकापवादतः । अहो सतामपि भुवि भवनं भुरिदुःखदम् ।। ६० ।। यदा यदाऽकरोद्यज्ञं रामो राजीवलोचनः । तदा तदा स्वर्णमयीं सीतां कृत्वा विधानतः ॥ ६१ ॥ याच ग्रंथाच्या ७ व्या खंडाच्या १६ व्या अध्यायांत वाल्मीकीच्या रामचरिताचा असा उल्लेख आहे. -- वीथ्यां वीथ्यां च शृण्वंति जनाः सर्वे गृहे गृहे । वाल्मीकिकाव्यं केचिद्वै श्रीरामचरितामृतम् ॥ २२ ।। यावरून गर्गास वाल्मीकीचा रामायणग्रंथ माहीत असून बहुधा तेव्हां त्यांत उत्तरकांडहि होतें अस कळून येतें; कारण उत्तरकांडांतील कथेचा त्यानें वर उल्लेख केलेला आहे. ( ३ ) पद्मपुराणोक्त रामाश्वमेधपर्वा ( अ० ६६ ) मध्ये वाल्मी- कि रामायणाविषयी लिहिते वेळीं असें म्हटले आहे कीं:- षट् कांडानि सुरम्याणि यत्र रामायणेऽनघ । वालमारण्यकं चान्यत् किष्किंधा सुंदरं तथा ॥ ६२ ॥ युद्धमुत्तरमन्यच्च षडेतानि महामते ।