पान:रामायणनिरीक्षण.pdf/५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

रामायणनिरीक्षण. ४१ ( ५ ) कामंदकीपेक्षां जुन्या व कामंदकीनें ज्याचे श्लोकांचे उतारे घेतले आहेत अशा शुक्रनीतींतहि अनेक रामपर उल्लेख आहेत. शुक्रनीति संस्कृत वाङ्मयांत फार प्रसिद्ध आहे. स्त्रि. पू. ४०० ते ५०० या दरम्यान किंवा त्याहून पूर्वी इ. पू. १०० ००० च्या सुमारास होऊन गेलेल्या चरकानें आपल्या ग्रंथांत ( कलकत्ता प्रत, पृ. ३०४ ) " बार्हस्पत्यमौशनसं असा शुक्रनीतीविषयीं उल्लेख केलेला आहे. तेव्हां ही शुक्रनीति स्त्रि. पू. ५०० च्याही पूर्वीची असावी हैं उघड होतें. या शुक्रनीतींत रामायणाच्या उत्तरकांडांतील एका कथा- प्रसंगाचा असा उल्लेख आहे: सीता साध्यपि रामेण त्यक्ता लोकापवादतः । शक्तेनापि हि न धृतो दंडोऽल्पो रजके क्वचित् || ( शुक्रनीति १-१३४ ) यावरूनहि बऱ्याच प्राचीनकाळीं उत्तरकांडाचा प्रादुर्भाव लोकांत झालेला असावा हेंच कळून येईल. असो. "" उत्तरकांड [ कोणत्यातरी रूपानें का होईना ] येथें बऱ्याच प्राची - नकाळीं प्रचलित होतें हैं पाहिल्यानंतर, आपण मूळचें उत्तरकांड वाल्मीकीनेंच लिहिलें असें ह्मणण्यास आपल्याजवळ काय पुरावा आहे तो पाहूं: -- ( १ ) जैमिनीच्या अश्वमेधांत ( ३६-८४ ) खालील श्लोक आहे:- नाख्यातवानिदं युद्धं वाल्मीकिः पितृपुत्रयोः | यद्याख्यास्यत् अमज्जिप्यत् लोकोऽयं करुणार्णवे ॥ यांत, रामाश्वमेधाच्या हकीकतीशिवाय बाकीची सर्व कथा वाल्मी- कीनें आपल्या ग्रंथांत ( रामायणांत ) वर्णन केलेली आहे, असा