पान:रामायणनिरीक्षण.pdf/४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण ५ वें, जुनें नाहीं; वाल्मीकीनें लिहिल्याप्रमाणेच कांहीं तें उरलेलें नाहीं; पण कांहीं लोक उत्तरकांड हें वाल्मीकीचे नव्हेच असे दाखविण्या- चा जो यत्न करितात तो मात्र अगदीं अनुचित व चुकीचा आहे. उत्तरकांडाचें सद्यः स्वरूप अलीकडचें आहे, ह्मणून मूळचें उत्तरकांड वाल्मीकीनें लिहिलें नसावें असें ह्मणणे अगदीं चुकीचे होईल. ( ३ ) सीतेला वनांत सोडून दिल्यानंतर यज्ञ करितेवेळीं राम सुवर्णमयी सीतेची प्रतिमा करून आपल्या जवळ ठेवी, याचा उल्लेख कर्मप्रदीप उर्फ कात्यायनस्मृति या कात्यायनाच्या ग्रंथांत असा आला आहे. ( ३-१-१०) रामोऽपि कृत्वा सौवणीं सीतां पत्नीं यशस्विनीम् । ईजे यज्ञैर्बहुविधैः सह भ्रातृभिरर्चितः ( अच्युतः ) ।। हा कात्यायनाचा ग्रंथ सामवेदाचा परिशिष्ट समजला जातो. हा कात्यायन त्रि. पू. ४०० च्या सुमारास झाला असावा, असें पाश्चात्य पंडितांचे मत आहे; पण त्याहून तो ५००-६०० वर्षे तरी प्राचीनतर असावा, असे वाटतें. यावरून उत्तरकांड व त्यांतील कथा बऱ्याच प्राचीन आहेत हैं उघड होतें. ३०० ( ४ ) भारतनिरीक्षण या ग्रंथांतील एका भागांत भारताला सद्य: स्वरूप केव्हां प्राप्त झाले हे दाखविते वेळीं मीं त्रि. च्या सुमारास होऊन गेलेल्या कामंदकीय नीतिसारांतील अनेक पांडवपर व रामपर उतारे दिले आहेत. ( ते येथें पुनः देण्याचें मला कांहीं कारण दिसत नाहीं. ) रामपर जे त्यांत उतारे आहेत, त्यांत रामायणांतील सर्वहि कांडांतील कथांचा उल्लेख आहे.