पान:रामायणनिरीक्षण.pdf/४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३८ मकरण ५ वें. .... ठायीं उल्लेख आहे. रा. अभ्यंकरांनीं, याविषयीं बराच शोध करून लिहिलेल्या आपल्या 'रामायणानंतरचें भारत ' या निबंधांत, अनेक उताऱ्यांचा विचार करून [ पृ० १३०-१३१-१३९ ] असें झटलें आहे की:- “ व्यासांनीं रामोपाख्यानांत रामायणाच्या सर्व कांडांतील श्लोक उतरून घेतले आहेत असे वाचकांचे लक्षांत येईल. या उतान्यांतील कथा उत्तरकांडांत आल्या आहेत, त्या- वरून उत्तरकांड भारताचे वेळीं होतें यांत संशय नाहीं. उत्तरकांडांत पुष्कळ कथा अशा आहेत की, त्यांचा रामायणाशी फारसा संबंध नाहीं, व मागील सहा कांडांची त्याच्याशी तुलना केली असतां हैं मागन झालेले असावें असें वाटतें. असें जरी असले तरी भारताचे वेळीं समग्र रामामण तयार झालें होतें, एवढेच नव्हे तर राम ज्या स्थानीं राहिले होते, त्यांस तीर्थत्व प्राप्त झालें होतें उताऱ्यांत रामायणाच्या सर्व कांडांतील कथा आल्या आहेत. " रा. अभ्यंकर यांच्या या उद्गारांवरून व भारतांतील उताऱ्यांवरून असे कळून येईल की रामायणांत भारताच्या सद्यः स्वरूपकाळी * तरी उत्तरकांडाचा समावेश झालेला होता. ह्मणजे खि. पू० ३०० च्या ही पूर्वी एक उत्तरकांड रामायणाचा भाग म्हणून प्रसिद्ध. होतें. हैं मूळचें उत्तरकांड वाल्मीकिऋषीनेंच लिहिले असावें हें पुढें १' भारताचे वेळी ' ह्मणण्यापेक्षां 'भारताच्या सद्यःस्वरूपाच्या वेळीं असे म्हणणें येथें विशेष योग्य दिसतें. या ....

  • भारताच्या वनपर्वाच्या १४७ व्या अध्यायांत भीम जेव्हां मारुतीस भेटतो

तेव्हां तो हनुमानाविषयीं त्यास असें म्हणतो:-- रामायणेऽतिविख्यातः श्रीमान् वानरपुंगवः ॥ ११ ॥ नंतर मारुति आपली हकीकत सांगत असतां १४८ व्या अध्यायांत अर्से म्हणतो कौं:-