पान:रामायणनिरीक्षण.pdf/४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

रामायणनिरीक्षण. प्रकरण ५ वें. +0+ उत्तरकांड किती प्राचीन आहे ? ३७ वैशंपायनी भारत व जैमिनीय अश्वमेधपर्व या दोहोंना सद्य: स्वरूप खि. पू० ३०० ते ४०० च्या दरम्यान प्राप्त झाले आहे, असें मीं आपल्या भारतनिरीक्षण ग्रंथांत दाखविले आहे. जैमिनीय अश्वमेध- पर्वत ( अध्याय २५ ते ३७ पर्यंत ) रामाची रावणास जिंकून परत अयोध्येस आल्यानंतरची हकीकत असून, त्यांत सीतेला वनांत सोडून दिलेली वगैरे सर्वहि उत्तरकांडातील हकीकत आहे. ही हकी- कत मी दुसरीकडे दिली आहे. सारांश, जैमिनीय अश्वमेधपर्वास प्र- स्तुत स्वरूप प्राप्त व्हावयाचे वेळीं तरी वाल्मीकीच्या ( जैमिनीच्या अश्वमेघांत उत्तरकांडहि वाल्मीकीनेंच रचिलें अशी स्पष्ट समजूत आहे ) उत्तरकांडाची माहिती लोकांस होती. ( २ ) वैशंपायनी भारतांतहि उत्तरकांडांतील कथांचा अनेक णांवरून एवढं सिद्ध होतें कीं, प्राचीन अयोध्या शहर भरभराटीत असतां, तेंच को- शलदेशाची राजधानी असतां-लाकेत नांव निघण्याचे पूर्वी व कोशल देशाची राजधानी श्रावस्ती नगरी होण्याचे पूर्वी-मूळचें रामायण रचिले गेले असावें. ही स्थिति गौतमबुद्धापूर्वी कितीतरी शतकें असावी. असो. - आमच्या पुराणांमधून रामापासून ( पांडवाच्या समकालीन ) बृहद्वला पर्यंत ^३० पिढ्या व पुढे वृहद्वालापासून या प्रसेनजितापर्यंत २७ पिढ्या आढळतात. ह्मणजे एकून ५७ पिढ्या अंतर पडलें. पिढीस ३० वर्षे धरिलीं, तर राम व प्रसेनजित् यांच्यामधील अंतर ५७८३०८१७१० वर्षे पडले ! म्हणजे रामाचा काळ १७१०×६००८२३१० ख्रि. पू. च्या सुमारास आला ! हॅच आम्ही दुसरी- -कडे दाखवीलें आहे. रामाचा काळ ख्रि.पू. २२०० ते २५०० च्या दरम्यान असावा.