पान:रामायणनिरीक्षण.pdf/४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण ४ थें. उर मूळचें रामायण गौतमबुद्धाच्या उदयापूर्वी ( त्रि.पू. ६०० ) रचलें गेलें याबद्दल अलीकडे युरोपियन शोधकांस देखील शंका •लेली नाहीं. वर प्रो. याकोबीचे विचार दिलेलेच आहेत; अलीकडे त्या- नंतर प्रो. म्याकूडोनेलूनींही आपल्या संस्कृत वाङ्मयाच्या इतिहा सांत ( पृ० ३०९ - १० ) याविषयीं असे उद्गार काढिले आहेत:- " The cumulative evidence of the above argu- ments makes it difficult to avoid the conclusion that the kernel of the Ramayana was composed before 500B. C., while the more recent portions were probably not added till the second century B.C. 33 and later. रामायणाला सद्यःस्वरूप पुढें प्राप्त झाले असले तरी मूळचें रामायण खि. पू. ५०० च्या पूर्वी झाले असले पाहिजेत हें युरो- पीय लोकही अलीकडे कबूल करूं लागले आहेत एवढेच आमचे पाहणें आहे. रामायणांत वर्णन केलेल्या पूर्वेकडील भारतवर्षाच्या राजकीय परि- स्थितीवरूनही मूळ रामायण हें बुद्धाच्या उदयापूर्वीच रचलेले असावे, असेच सिद्ध होतें. कारण ख्रि. पू. ४०० च्या सुमारास कालाशोकराजानें वसविलेल्या पाटलीपुत्र (पाटणा ) शहराचा रामायणांत कोठेंहि उल्लेख नाहीं; तें शहर जर वा ल्मीकीच्या वेळेस असते, तर त्याचा खालीने रामायणांत उल्लेख आला असता; पण वाल्मीकि प्राचीन असल्यामुळे हा उल्लेख नाहीं. दुसरें, रामायणांत कौशल देशाच्या राजवानीस अयोध्याच झटलेले आहे; बौद्ध, जैन, ग्रीक बगैरे लोक व पतंजलि हे त्यास साकेत असे म्हणत. अयोध्या हेच त्याचे जुने नांव आहे. तिसरें, गौतमबुद्धाच्या वेळीं ( मरण ख्रि.पू. ५४३ ) कोशल देशाचा राजा प्रसेनजित् हा असून, त्याची राजधानी श्रावस्ती शहर होतें. या सर्व प्रमा-