पान:रामायणनिरीक्षण.pdf/४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

1 JAN 1994 रामायणनिरीक्षण, ३५ ची भाषा संस्कृत असली पाहिजे. म्हणून अशोकाचे पूर्वी कमत कमी २०० वर्षे, म्हणजे अर्थात्च बुद्धाचें पूर्वी वाल्मीकीनें आपलें काव्य रचलें. बुद्धांचेनंतर जर तें काव्य झालें असतें तर त्यांत प्राकृत भाषेतील पुष्कळ रूपें आलीं असतीं. ( त्यांचा रामायणावरील निबंध पहा. ) वरील एकंदर प्रमाणांवरून पाहतां, वाल्मीकीचें मुळचें रामायण गौतमबुद्धापूर्वीच उत्पन्न झालेलें होतें, याबद्दल कोणासही आतां शंका राहणार नाहीं, अशी मला खात्री वाटते. म्हणजे, ख्रि. पू. ६०० च्या पलीकडे तर वाल्मीकि गेलाच; आतां पुढील प्रश्न असा आहे कीं, वाल्मीकि हा रामाचा समकालीन होता किंवा नाहीं ? या प्रश्नाच्या उत्तरावरच, वाल्मीकीला ख्रि. पू. ६०० च्या पलीकडे नेतां येते किंवा नाहीं ह्या महत्वाच्या प्रश्नाचे उत्तर अवलंबून आहे. पण वरील सर्व प्रमाणांवरून एवढी तर गोष्ट सिद्ध झाली कीं, स्त्रि. पू.६००च्या अलीकडे कांहीं वाल्मीकीस आणितां येत नाहीं; मग तो याहून कितीहि प्राचीन असो. तो किती प्राचीन होता व तो रामाचा समकालीन होता किंवा नाहीं हैं आम्हीं पुढें पाहूं. सध्यां उत्तरकांड किती प्राचीन आहे, व तें वाल्मीकि ऋषीनेंच रचिलें किंवा नाहीं हें पुढील भागांत अवलोकन करूं. ( १ ) रामायणांतील व्यक्ति बन्याच प्राचीन आहेत; केकय देशचा राजा अश्व- पति याचा उल्लेख जनकाचा समकालीन म्हणून छांदोग्य उपनिषदांत व शुक्लयजुर्वेदाच्या ब्राह्मणांत आलेला आहे. तैत्तिरीय प्रातिशाख्यांत अग्निवेश्यानंतर गुरूंच्या यादीत वाल्मीकीचं नांव आढळर्ते. तैत्तिरीयवेदांत भरद्वाज व अत्रि हे गुरु ह्मणून आढळतात. इक्ष्वाकु, दशरथ, व राम यांची नांवें ऋग्वेदांत मोठाले राजे म्हणून आढळतात; पण तेथे त्यांचा एकमेकाशी संबंध दाखविलेला नांहीं, हे उघडच आहे. असो.