पान:रामायणनिरीक्षण.pdf/४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३४ प्रकरण ४ थे. वरील दोन्ही उताऱ्यांवरून वेबरसारख्या दुर|ग्रही जुन्या शोधकां- शिवाय अलिकडचे नवे शोधक, बौद्ध कथांना त्यांहून प्राचीन अशा ब्राम्हणी परंपराच आधारभूत असल्या पाहिजेत, हें कबूल करीत असल्याचें दिसून येईल. एकंदर जातकांविषयींचें नव्या शोधकांचें मत पाहिल्यानंतर दशरथजातकाविषयींच एक नवा युरोपीयन शोधक काय म्हणतो हें पाहूं:- The Dasharatha Jataka shows, it knew the latter part of the रामायण, moreover, a verse from the old part of the रामायण ( VI. 128 ) actually occurs in a Pali form embedded in the prose of this Jataka. ... ... The balance of evidence in relation to Buddhism seems to favour the pre-Buddhistic origin of the genuine ....... Prof. Weber's assumption of Greek influence in the story of the रामायण seems to lack foundation. Mac Donnel's Hist. Sansk. Lit. p. 307 वरील उताऱ्यांत प्रो. म्यॉकूडोनल् यांनी अलीकडे स्पष्ट कबूलच केलें आहे की झूळचें रामायण हें दशरथजातकापेक्षां किंवा बुद्धा- च्या उदयापेक्षाही प्राचीनतर असावें; व दशरथजातकावरून पाहतां त्यांत ( कोणत्या तरी रूपानें का होईना ) उत्तरकांड ही पण तेव्हां असावें. प्रो.म्याक्डेोनेल् प्रमाणेंच प्रो. याकोबी ( जर्मन ) यांचें असें म्हणणे आहे कीं, अशोकाचे शिलालेख सर्व प्राकृत भाषेत आहेत, यावरून त्यांचे वेळीं म्हणजे स्त्रि० पू० ३०० वर्षे हिंदुस्थानांतील लोकांची बोलण्याची भाषा प्राकृत होती. आपल्या काव्यानें सर्वजन- समूहाचें मनोरंजन व्हावें, असा कवींचा हेतु असतो. वाल्मीकीनें संस्कृतांत आपलें काव्य रचलें, यावरून त्यावेळी लोकांची बोलण्या-