पान:रामायणनिरीक्षण.pdf/४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

थे. पंज रामायणनिरीक्षण. ३१ भावांची लग्न झालेली आर्यांच्या इतिहासांत कोठें दिसून येत नाहींत. ] ( ३ ) दशरथाची पहिली महिषी निवर्तल्यानंतर दुसरी त्यानें केली. [ या दोघींचीं नांवें नाहींत. ] दुसऱ्या महिषीस भरत नामें मुलगा झाला. ती राजास फार प्रिय होती. तिनें आपल्या मुलास राज्याभिषिक्त करावें लणून वर मागून घेतला. दशरथास पहिल्या महिषीच्या पोटीं दोन मुलें व एक कन्या झालीं होतीं. त्यांचीं नांवें राम, लक्ष्मण व सीता हीं होत. भरत आठ वर्षीचा झाल्यानंतर त्याच्या दुसऱ्या महिषीनें भरतास राज्य देण्याविषय राजास निकड लाविली. तेव्हां राजानें, स्त्रियांचा स्वभाव ओळखून व आपली दुसरी महिषी आपल्या सवतीच्या मुलांचा घात करील हे जाणून, आपल्या मुलांस बोलावून त्यांस सांगितले कीं: -“ येथें राहणें तुम्हांस धोक्याचे आहे; तेव्हां सध्यां तुम्हीं वनवासास जाऊन मी मेल्यानंतर येऊन राज्य आपल्या ताब्यांत घ्या. " नंतर ज्योतिष्यांना आपले आयुष्य किती आहे हे त्यानें विचारून मुलांस फिरून सांगितलें कीं:- “मुलांनों! बारा वर्षांनंतर परत या. " मुलांनीं तें कबूल केलें. तें ( ४ ) सीता ( बहीण. ) ही राजास म्हणाली – “मीहि आपल्या दोघां भावांबरोबर वनवासास जाते. " ( बहिणीस कैकयीच्या राज्य- लोमाच्या कल्पनेपासून काय भय प्राप्त होत असे. हें कांहीं कळत नाहीं. तिचे लवकरच लग्न होऊन ती सासरी जाणारी, रामाश ( भावाशीं ! ) तिच लग्न व्हावयाचा निश्चयहि पण झाला नव्हता, अशा स्थितींत बहिणीस-भावांबरोबर वनांत कां पाठविण्यांत आले हे कळणे कठिण आहे.) ( ५ ) राम, लक्ष्मण व सीता हे हिमालय पर्वताकडे वनवासास गेल्या नंतर दशरथ पुत्रदुःलानें नऊ वर्षांनी वारला. (दशरथाला पुत्रदुःख