पान:रामायणनिरीक्षण.pdf/४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३२ मकरण ४ थे. कां व्हावे हे कळत नाही. त्याने आपण होऊनच त्यांच्या सुरक्षितते- साठी त्यांस वनास पाठविले होते. पुत्रदुःखान नऊ वर्षांनी दशरथ वारला; किती थोडी वेळ ही ! ! ! ) ( ६ ) पुढे त्या दुसऱ्या महिपीनें भरतास राज्यावर बसविण्याचा घाट घातला, भरतानें रामाकडे जाऊन पितृमरणाची वार्ता त्या तिघांस कळ- विली.भरतानें रामास वाराणसीस येऊन राज्यावर आरूढ होण्याची विनंति केली; पण रामानें तें कबूल केलें नाहीं. राम म्हणाला – “ दशरथानें मला १२ बारा वर्षांनंतर परत येण्यास सांगितले आहे; तेव्हां आणखी तीन वर्षांनी मी परत येतों " राम येत नाहीं असे पाहून भरत रामाच्या पादुका घेऊन तेथें राज्य करूं लागला. त्या पादुका राज्यांत अन्याय झाला असतां एकमेकांवर आपटत असत. राम बारा वर्षांनंतर येऊन राज्यारूढ झाला व त्यानें १६००० वर्षे राज्य केलें:- " दशवर्षसहस्राणि षष्टिवर्षशतानि च --- कंत्रीवो महाबाहुः रामो राज्यमकारयत् " ( त्यांत दशरथानें आपण वारल्यानंतर येण्यास रामास सांगितलें असूनहि राम राज्य घेण्यास कां गेला नाही हे कळणे कठिण आहे. बौद्धांचा ज्योतिषी लोकांवर कटाक्ष होता, म्हणून त्यांचं भविष्य खोटें पाडून ९ व्या वर्षी दशरथास त्यांनी मारिलें आहे ! !! ) या प्रकार बौद्ध रामकथेत फारच विसंगतता असून ती बहुत विपर्यास पावली आहे, हे मराठी वाचकांसहि कळून येईल. बौद्ध रामकथेत वनवासांत सीतेचें हरण व पुढे राक्षसांचा वध वगैरे कांहीं एक झालेला नाहीं. ही बौद्ध रामकथाच मूळची असे वेवर समजतो; १ बौद्धांची रामकथा दशरथजातक व रामजातक या दोन ग्रंथांत मिळते.