पान:रामायणनिरीक्षण.pdf/३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
३०

प्रकरण ४ थें. “ There was an old Ramayana of वाल्मीकि, before the rise of Buddhisin, which by its जातक only natu- rally tried to incorporate the popular heroes of the Aryans in its own theology and in its own garbe (पृ० ७५) यावरून बौद्ध लोकांचें दशरथजातक निपजण्याचे पूर्वीच • वाल्मीकीचें मूळचें रामायण आर्यावर्तीत प्रसिद्ध होते हैं उघडच होतें. रामकथेचा विपर्यास बौद्धांनी केलेला असल्यामुळे त्यांची विपर्यस्त कथा मूळची नव्हे हे उघड आहे. भारतांतील रामोपाख्यान व दशरथजातक या दोहोंच्याही पूर्वी वाल्मीकीचे मूळ रामायण आर्यलोकांत प्रसिद्ध होतें. आतां, भारतांतील रामोपाख्यानापेक्षां तरी दशरथजातक प्राचीन आहे किंवा नाहीं, या प्रश्नाचा निकाल लागणे कठिण दिसतें. कदाचित् तें भारतांतील रामोपाख्यानापेक्षां प्राचीनतर असेल; पण जरो तें रामोपाख्यानापेक्षां प्राचीनतर असले तरी मूळच्या रामायणाच्या कर्थेत कसकसे फरक पडत गेले याचा ऐतिहासिक - दृष्ट्या अभ्यास करितेवेळीं दशरथजातकाचा कांहींच उपयोग होणार नाही. कारण, दशरथजातकांतील रामकथा विपर्यस्त झालेली आहे. विपर्यासानें मूळचें स्वरूप कधीं कळत नाहीं. बौद्ध रामकथेंत व आर्य रामकथेंत किती अंतर आहे हे कळण्यासाठी खालील मुख्य मुद्दे देतां:-- ( १ ) चौद्धांच्या नेहमींच्या पद्धतीप्रमाणे दशरथ हा वाराणसी ( काशी ) येथील राजा होता असे म्हटलें आहे व रामाचा नेहमींच्या बौद्ध भिक्षूंच्या पद्धतीप्रमाणे हिमालयांत घालविला आहे. बनवास ( २ ) सीता ही रामाची बहीण केलेली असून वनत्रासांतून परत आल्यानंतर तिचें रामाशीं लग्न झाले असे म्हटलें आहे ! [ हें अत्यंत चिलक्षण आहे. तरुण बहिणीस भावाबरोबर वनवासास पाठविण्यास "कोणीहि शाहाणा मनुष्य तयार व्हावयाचा नाहीं; तसेच बहिणीश ---