पान:रामायणनिरीक्षण.pdf/३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२९. la भूगोलाचर JAN गएपनिरीक्षण. पुस्तक लिहिलेले आहे. ही पुस्तकें आपापल्या परीने वरी आहेत. पण अलिकडे प्रसिद्ध झालेले रा. वैांचे रामा- यणावरील पुस्तकानें या सर्वांस मागें टाकिलें आहे. असो. प्रकरण ४ थें. वाल्मीकि रामायण व दशरथजातक. दशरथजातक म्हणजे काय हें मराठी वाचकांस आधी सांगितलें पाहिजे. बौद्ध लोकांत 'जातक' म्हणजे ' पूर्वजन्मकथा' नांवाचे ग्रंथ आहेत, त्यांत गौतमबुद्ध पूर्वजन्मीं आपण कोण कोण होतो हैं सांगत असतो. या प्रकारचेंच दशरथजातक हैं एक जातक आहे. यांत गौत- मबुद्ध शेवटीं म्हणतो:--" त्या वेळचा महाराजा दशरथ म्हणजे ( माझा बाप ) महाराजा शुद्धोदन होय; रामाची आई (कौसल्या ) ती ( माझी आई ) महामाया ( उर्फ मायादेवी ) होय. सीता तीच ( माझा मुलगा ) राहुल याची आई होय; भरत तोच ( माझा बंधु ) आनंद, लक्ष्मण तोच सारिपुत्र ; तो जनसंघ तोच बुद्धांचा जनसंघ आणि राम तोच मी होय. " याप्रकारें प्राचीन आर्यातील प्रसिद्ध अशा व्यक्तींशीं गौतम बुद्ध केव्हां केव्हां त्यांच्या गोष्टींत विपर्यास करून आपले तादात्म्य दाखविण्याचा यत्न करीत असे. रामाच्या गोष्टींतही बौद्ध लोकांनी आपणांस पाहिजे तसा विपर्यास केलेला आहे. रा. वैद्य यांनी आपल्या Riddle of the Ramayana (११९३ - १९६) या पुस्तकांत या दशरथ जातकांतील गोष्टी देऊन ती कशी विपर्यस्त झालेली आहे हे त्यांनी दुसरीकडे सिद्ध केलेले आहे [पृ. ७३-७४ ]. ते शेवटीं म्हणतात कीं:— १ अतंगलुवंशांतही बुद्ध असच म्हणत आहे.