पान:रामायणनिरीक्षण.pdf/३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२८ प्रकरण ३ रें. आम्ही दाखविले लणून त्यांच्या पुस्तकांत मतसेदाची स्थळे वगैरे कांहींच नाहीत असे मात्र कोणीं मानूं नये; कारण, अशा प्रकारच्या शोधात्मक ग्रंथांत एकानें चुकी केल्याखेरीज दुसरा ती सुधरति नाहीं. प्रत्येकाची कांही गोष्टींसंबंधानें मतें निरनिराळी पडण्याचा संभव आहे. परंतु एकंदरीत पहातां रा. वैद्यांचीं Mahabharatata criti- cism, व The riddle of the Ramayana ही पुस्तकें वाचून कोणाच्याहि मनावर चांगलाच परिणाम होतो हे येथे नमूद करून ठेविले पाहिजे. १४ बंगाल्यांतहि अलिकडे आर्धमहाकाव्यांचा थोडाबहुत अभ्यास चालल्याप्रमाणे दिसतो. कै. रमेशचंद्र दत्त यांनी प्राचीन भारत वर्षातील संस्कृतीवर जो ग्रंथ लिहिलेला आहे, त्यांत बहु- तेक पाश्चात्यांचींच मते व तीहि बरीच जुनी घेतलेली असल्यामुळे, तो ग्रंथ शोधकांच्या दृष्टीनें निरुपयोगी झालेला आहे; पण साधारण वाचकास सामान्य माहितीसाठीं तो ग्रंथ उपयुक्त आहे. पण त्यांतील भारत व रामायण यांविषयींचा मजकूर मात्र अलिकडे सपशेल चु- कीचा आहे असे ठरलें आहे. शोधकांच्या दृष्टीने वरील त्यांचा ग्रंथ जरी निरुपयोगी आहे, तथापि त्यांनी इंग्रजींत रामायण व महाभारत यांचें जें श्लोकबद्ध सौर काढून प्रसिद्ध केलेले आहे. ते इंग्रजी वाच- कांस उपयोगी पडण्याजोगे आहे. बंगाल्यांत जलेकडे रा. प्रफुल्लचंद्र यांनीं Valmiki and his times हे पुस्तक लिहिले आहे; तसेच रा. नवीनचंद्रदास यांनीं रामायगावरून त्या काळच्या प्राचीन ( १ ) अलीकडे महाराष्ट्रांत बालरामायण (आपटे), रामायणाचं सरळ गोष्टीच्या रूमान भाषांतर (द्रविड), रामचरित्र (रा. वैद्य ) इ. नांवांनी रा. चीं सारें व चिरळग- कर व लेले यांची भाषांतर वगैरे प्रसिद्ध झालेली आहेत. पूर्वी मराठीत, भात्रार्थ - रामायण, रामदासी रामायण, रामविजय वगैरे ग्रंथ प्रसिद्ध झाले आहेत.