पान:रामायणनिरीक्षण.pdf/३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

रामायणनिरीक्षण. २७. ग्रंथांचें आम्हींच सूक्ष्म अवलोकन करून खरें खोटें करून घेतलें पाहिजे. रा. अभ्यंकरांनी पहिल्या निबंधानें, महाभारतास [ निदान त्याच्या सद्यःस्वरूपास ] वाल्मीकि रामायण ग्रंथ [ मग तो मूळचा असेल - सध्यांचा नसेल ] ठाऊक होता इतकेंच नव्हे, तर भारतांत रामायणांतील उतारेहि आढळतात, यामुळे मूळचे रामायण निदान भारताच्या सद्यः स्वरूपाहून तरी प्राचीन धरावें लागतें; व एकदां तें तितकें प्राचीन धरिलें ह्मणजे होमरवरून रामायण रचल्याची कल्पना अजी सोडून द्यावी लागते, असे दाखविलें. रा. अभ्यंकरांच्या दुसऱ्या निबंधांत वा. रा. विषयीं त्यांचे सामान्य विचार आहेत. लंकेचे राक्षस बौद्ध नव्हेत वगैरे मुद्दे त्यांनी सिद्ध करून दाखविले. अलिकडे आप महाकाव्यांचा दुसराच एक विद्वान् भोक्ता महारा- ष्ट्राच्या क्षितिजावर उदय पावलेला आहे. या रसिक व विद्वान् लेख- काचे ग्रंथ वाचून मनाला विलक्षण आनंद वाटतो; व हा महाराष्ट्रास भूषण आहे असे वाटू लागतें. या विद्वान् गृहस्थांचे ग्रंथ इंग्रजीत आहेत, ही मराठी वाचकांची एक गैरसोय आहे ही गोष्ट खरी !. तथापि, रा. वैद्य यांनी इंग्रजीत का होईना पण चिकित्सक व विवे- चक दृष्टीने लिहिलेले दोन्ही ग्रंथ प्रत्येक इंग्रजा जाणणान्या गृहस्थानें वाचण्यालायक झाले आहेत यांत कांहींच शंका नाही. हे दोन्ही ग्रंथ वाचून कोणासहि आपल्या आर्ष महाकाव्यांविषयीं अधिक अभिमान उत्पन्न होणार असून, शिवाय त्यांचे एकदां तरी मुळांत अवलोकन करावें असें वाटणार आहे. रा. वैद्यांच्या या दोन्ही ग्रंथांत त्या त्या काळची ऐतिहासिक राजकीय परिस्थिति जी शक्य व खरी करून दाखविण्याचा यत्न केलेला आहे, तो खरोखरच अभिनंदनीय व स्तुत्य असून, तो त्यांस चांगलाच साधला आहे. आतां वरील गुण