पान:रामायणनिरीक्षण.pdf/३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

, २६ प्रकरण ३ रें. ११ रामायणावरील टीका:--रामायणावरील प्राचीन टीका हाटली ह्मणजे कतकाची होय. त्यानंतरची रामटीकाकाराची • रामा- यण तिलक ' नामक टीका होय. रामाश्रमी टीकेंत ' तीर्थ' टीका- कारांचाहि उल्लेख येत असतो. या टीकाकारांविषयीं विशेष कांहीं माहिती उपलब्ध नाहीं. १२ रामायणावर युरोपिय लोकांनी चर्चात्मक निबंध लि हिलेले आहेत, त्यांपैकी सर्वांत प्राचीनतर ह्मणजे वेबरचा होय. यांच्या रामायणावरील निबंधांत व इतरत्र यानें असें प्रतिपादन केलें होतें कीं, रामायण होमरचें ईलियड हें काव्य पाहून नंतर कोणी इकडे रचलें; त्याअर्थी तें स्त्रि. श. नंतर पहिल्या शतकांत वाल्मीकीनें अगर कोणींतरी रचलें असावें. पण हे विचार चुकीचे आहेत, असे अलिकडे म्याक्- डोनेल्, जेकोबी वगैरे इतर युरोपस्थ शोधकांनीं निःसंशयपणें दाखविलें आहे. म्याकडोनेल्च्या संस्कृत वाङ्मयाच्या इतिहासांतील वरील लेख वाचला ह्मणजे अलिकडे तिकडचें वातावरण कसें निवळत चालले आहे, हें कळून येईल. रामायणा- १३ इकडेहि वेबरच्या वरील आक्षेपांस उत्तर देण्यांचा यत्न कोणी केला नाहीं असें नाहीं. न्या. तेलंग यांनीं Was Ramayana copied from Homer ? हा निबंध लिहून त्याचे आक्षेप खोडून टाकण्याचा यत्न केला; पण न्या. तेलंगांच्या संशयित व मुळमुळीत लेखनपद्धतीमुळे वाचकांच्या मनांत वेबरचें ह्मणणे थोडेतरी मुळांत खरें असावें असें शेवटीं वाटत असे ! पण अलिकडे महाराष्ट्रांत रा. अभ्यंकरांनीं रामायणानंतरचें भारत व वाल्मीकि रामायण हे दोन शोधानें भरलेले निबंध लिहून वेबर व पाश्चात्य अनेक कुतर्की- यांचे विचारांस आळा घातलेला आहे. खरें पाहिले असतां आमच्या