पान:रामायणनिरीक्षण.pdf/३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

रामायणनिरीक्षण. २५ विषयीं हकीकत असतेच. अग्निपुराणाच्या प्रारंभीच्या कांहीं अध्यायां- मध्ये तर वाल्मीकिरामायणाचें सारच दिले आहे; नृसिंहपुराणोक्त रामायणहि तलेंच बा. रा. चं सारच आहे. ब्रह्मपुराणामध्ये गौतमीमाहात्म्य म्हणून बराच प्राचीन भाग आढळतो. त्यांत रामायणांतील व्यक्तींविषयीं कांहीं अध्याय आहेत; त मात्र रामकथेच्या अभ्यासास बरेच उपयोगी पडतील असे वाटतें. आनंदाश्रममतीच्या खालील अध्यायांत रामयणांतील व्यक्तीविषयीं कथा आहेत. ८४-८७-८८-८९-९३-९७-१२३-१४३ -१५४ १५७-१६०-१७०-१७६. १२३ व्या अध्यायांत रामाच्या बाल- पणाची वनवासापर्यतची हकीकत आहे; १५४ व्या अध्यायांत राम लंकेहून आल्यानंतरची उतरकांडांतील हकीकत आहे: १५७ व्या अध्यायांत रामाने किष्किवावासी लोकांच्या साहाय्याने रावणास मा- रिल्याचा उल्लेख आहे. एकूण ब्रह्मपुराणांतील वरील अध्याय रामक- थेच्या अभ्यासास बरेच उपयोगी पडतील असे वाटतें. याप्रमाणें प्राचीन संस्कृत वाङ्मयांत रामचरित्राविषयीं बरेंच वर्णन आढळतें. *

  • रामविजय, अध्याय १ मध्ये इतक्या रामायणाचा ओलेख केलेला

आहे :- १ वाल्मीकिरा., २ व्यासोक्तरा, ३ वसिष्ठरा. ४ शुकरा. ५ हनुमद्रा., ६ विभीषणरा, ७ ब्रह्मरा, ८ शिवरा., ९ अरुणरा., १० पझरा., ०१ आश्रर्यरा. ( वकाल्यावे ); १२ अगस्त्यरा., १३ शेषरा., १४ अध्यात्मरा, १५ शेवरा. १६ आगजरा, १७ कूर्मपुराणोक्तरा १८ स्कंदरा, १९ पौलस्त्यरामायण ( काळखंडी ); २० भरतराधरामा ही सर्व रामायण रामवि- जयकाराल केहून प्राप्त झाली, याचा शोध करणें जरूर आहे. यांतील बहुतेक रा. पुराणांतून आढळत असावीत, असं मला वाटते. आनंदरामायणाच्या छापील प्रतीच्या आरंभ पुस्तक प्रकाशकानें अशीच ९० रामायणांची यादी दिलेला आहे. ह्या सर्व रामायणांतून रामकथा कशा स्वरूपाने आढळते हे पाहणे जरूर आहे. १२९१