पान:रामायणनिरीक्षण.pdf/३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२४ प्रकरण ३ रें. ऐतिहासिक दृष्टया रामकथेचा अभ्यास करतेवेळीं याचाहि उपयोग होईल. ( ९ ) दशरथजातक हा एक बौद्ध ग्रंथ आहे. जातकग्रंथांतील गोष्टी व समाजस्थिति जरी प्राचीन असली तरी दशरथजातक अंशोकाच्यावेळी व नंतर त्यांची रचना झालेली आहे. अतिप्राचीन जातकाची रचना म्हटली म्हणजे अशोकाच्या वेळेस झालेली आहे. यामुळे आम्ही दारथजातकास कालानुक्रमांत भारतांतील रामोपाख्यानानंतर घातले आहे; व बहुधा तें रामोपाख्यानानंतरचेंच असावें तें जरी प्राचीन किंवा अर्वाचीन असले तरी आर्थरामकथेचा यांत अत्यंत विपर्यास केलेला असल्या- मुळे त्याच्याशी आम्हांस फारसे कर्तव्य नाही. शिवाय, अलीकडे दश- रथजातकांत वाल्मीकिरामायणांतील ३-४ श्लोक जसेच्या तसे पालीच्या अपत्रष्टस्वरूपानें आरून घेतलेले आढळलेले आहेत. वाल्मीकिरामायण [ मूळ ] रामाइतकें प्राचीन आहे हे ठाऊक असणाऱ्यांस वरील गोष्टीचें महत्त्व वाटत नाहीं; पण पाश्चिमात्य लोकांना या श्लोकांमुळे आपण रामायणाचा काळ बराच मागें नेला असें वाटत आहे ! आपणास या बौद्ध ग्रंथाशीं विशेष कर्तव्यच नाहीं ! ( १० ) वरील ग्रंथ बहुतेक स्त्रि. श. च्या पूपाचे आहेत म्हटलं असतां चालेल. स्त्रि. श. नंतरहि रामचरित्रावर बहुत ग्रंथ झालेले आहेत; त्यांत बहुतकरून वाल्मीकि रामायणाचेंच अनुकरण किंवा कचित्स्थळीं नव्या कथा व नवा मजकूर आलेला आढळतो. अशा ग्रंथांपैकी काहींची येथें नांवें देतों :-- अध्यात्मरामायण, अद्भुत- रामायण, आनंदरामायण, मंत्ररामायण, चंपूरामायण, नृसिं- हपुराणोक्त रामायण, पद्मपुराणोक्त रामचरित्र, पद्मपुराणोक्त रामाश्वमेधपर्व, इ. इ. प्रत्येक पुराणांत बहुतकरून थोडीबहुत रामा-