पान:रामायणनिरीक्षण.pdf/३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

रामायणनिरीक्षण. २३ [ परिशिष्ट ५ वें पहा ]. या उपनिषदांत ज्या अनेक व्यक्तींची नांवें आलेली आहेत तीं पाहिली असतां, किंवा कथेचा क्रम पाहिला असतां बहुधा तेव्हां वाल्मीकीरामायण हा ग्रंथ निपजलेला असावा, असेंच वाटतें; तथापि याविषयीं निश्चयात्मक पुरावा नाहीं एवढी गोष्ट खरी ! कसेंहि असो, रामकथेत कसकसे फरक पडत गेले हैं पहात असतां, ऐतिहासिकदृष्ट्या रामतापनीयोपनिषदांतील कथेला बरेंच प्राचीनत्व द्यावें लागेल हे उघड आहे. [ ७ ] भारतांत, सद्य:स्वरूप प्राप्त व्हावयाचे वेळीं किंवा तत्पूर्वी कोणीतरी रामोपाख्यान म्हणून रामकथेचा सारांश रामोपाख्यान दिलेला आहे. भारताला सद्यः स्वरूप त्रि. पू. ३०० - ४०० च्या सुमारास मिळाले असावें, असें मीं आपल्या भारत निरीक्षण ग्रंथाच्या एका भागांत दाखावेलें आहे. यावरून भारतांतील रामोपाख्यान खि, पू. ३०० इतकें तरी प्राचीन आहे, हें कळून येईल. हें रामोपाख्यान भारतांतील वनपर्वीत असून तें मार्कडेयाचे मुखानें वदविलें आहे. यांत वाल्मीकीचा किंवा त्याच्या रामायणाचा उल्लेख जरी नसला, तरी तें मूळच्या वाल्मीकिरामायणा- चेंच सार असावें असें एकंदरींत पहातां वाटणें साहजिक व योग्यच आहे; तथापि, हल्लींच्या रामायणांत व यांत बरेच फरक आहेत; ते दुस- रीकडे आम्हीं दाखविले आहेत. हें रामोपाख्यान भारत, वनपर्व, अ. २७३ ते २९३ पर्यंत आहे. ( ८ ) जैमिनिअश्वमेधपर्वीत अध्याय २५ ते ३७ पर्यंत लव- कुशोपाख्यान आहे. यांत राम राज्यावर बसल्या- जै. अ. तील ! पासून रामाचें व लवकुशांचें अश्वमेधयज्ञाचे वेळ लवकुशाख्यान | युद्ध होईपर्यंतची हकीकत आहे. हे आख्यान रामोपाख्यानाच्याच वेळेच्या सुमाराचे असावें.