पान:रामायणनिरीक्षण.pdf/३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण ३ रें. छोमशाचें रामचरित्र पाताळखंडामध्ये रामाश्वमेधनामक एक पर्व आहे. त्यांतील ३६ छत्तीसाव्या अध्यायांत लोमशऋषीनें रामाच्या समकालीन अशा आरण्यकऋषीस रामाचें चरित्र थोडक्यांत सांगितले आहे. हें चरित्र बरेंच प्राचीन दिसल्यावरून व आग्निवेश्य रामायणांत व लोमशाच्या रामचरित्रांत बरेंच साम्य व बराच निकट संबंध दिसल्यावरून मुद्दाम हेंहि मीं परिशिष्टरूपानें दिलें आहे. [परि- शिष्ट ३ रें पहा ]. आग्निवेश्यरामायण व लोमशाचें रामचरित्र या दोहोंवरून सीताहरणापासून रामाच्या अभिषेकापर्यंत एक वनवासाची रोजनिशी देण्याजोगी आहे; ती मी दुसरीकडे दिलेली आहे. माझ्या उताऱ्यांतील ८० व्या श्लोकावरून, हें रामचरित्र, राम राज्या- रूढ झाल्यानंतर व त्यानें अश्वमेधासाठों घोडा फिरावयास सोडिल्यानं- तर थोड्याच अवकाशानें लोमशानें आरण्यकऋषीस सांगितले असावें, असें कळन येतें. आरण्यकऋषीच्या आश्रमांत घोडा येईल असें लोमशानें यांत त्यांस सांगितले आहे. यावरून अश्वमेधयज्ञाचा घोडा फिरावयास निघून तो आरण्यकऋषीच्या आश्रमांत येण्यापूर्वीच हैं चरित्र लोमशानें सांगितलें असे वाटतें. केव्हां केव्हां पुराणांमधून प्राचीन वाङ्मयाचे अवशेष आढळतात, याचें हें एक उदाहरण आहे. [ ६ ] एथवर रामाच्या समकालीन अशा लेखकांविषयीं विवेचन झालें. यापुढचे बहुतेक वाङ्मय वाल्मीकीच्या रामायणानंतरचें व त्या रामायणासच अनुसरून असलेलें आहे. रामपूर्वतापनीयोपनिषदांत एकंदर ९४ श्लोक आहेत; त्यांपैकी श्लोक ३५ ते ४९ अखेरपर्यंत सीताहरणानंतरची रामाची ऐतिहासिक हकीकत आहे. हे लोक महत्त्वाचे असल्यामुळे मीं ते परिशिष्टरूपानें देऊन ठेविले आहेत २२ ( ५ ) पद्मपुराणांतील रामपूर्वतापनीय उपनिषत्