पान:रामायणनिरीक्षण.pdf/३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

रामायणनिरीक्षण. च्यवनरामायण होता: यानेंहि एक रामायण लिहिलेलें होतें, अर्से ख्रिस्ती शकाच्या पहिल्या शतकांतील अश्वधोपाच्या ' बुद्धचरित ' नामक काव्यावरून कळून येते. त्यांच्या काळीं तें कदाचित् उपलब्धहि असेल. त्याविषयी त्यांत असे लिहिले आहे कीं:- - वाल्मीकिनादय ससर्ज पद्यं । जग्रंथ यन्त्र व्यवनो महर्षिः १-४८ ।। याशिवाय, अधिक माहिती या रामायणाविषयीं मिळत नाहीं, ही मोठ्या दुःखाची गोष्ट होय. ६ वाल्मीकिरामायण [ ४ ] रामाच्या समकालीन लेखकवर्गात वाल्मीकि हाच अग्रगण्य होता हे त्याच्या विस्तृत रामायणावरून कळून येईल. वाल्मीकिरामायण [ मूळचें ] अगदी साधें व मनोहर असावें. हें वाल्मीकीनें कुश- लवांच्या जन्मानंतर बारावर्षांच्या आंत रचून प्रथम त्यास पौलस्त्य- वध असे नांव दिलें; यांत बहुधा ५०० सर्ग होते. यांत पौलस्त्याला आरून राम परत राज्याभिषिक्त होईपर्यंतचाच मजकूर होता. राम निज- धामास गेल्यानंतर वाल्मीकीनें उत्तरकांड रचून सप्तकांडात्मक रामायण चोवीस हजारांचा ग्रंथ केला; यांत रामाचा आधिभौतिक इतिहास होता. रामाच्या आध्यात्मिक इतिहासावर वाल्मीकीनें वासिष्ठरामायण म्हणून आणखी एक वतीसहजारांचा ग्रंथ लिहिला. एकूण वाल्मीकीने छप्पन्नहजार ग्रंथ लिहिला. हे दोन्ही वाल्मीकीचे ग्रंथ भारतीयांस सर्वमान्य आहेत. वासिष्ठरामायणांतील पौरुषच श्रेष्ठ होय, या विष- यावरील एक उतारा आम्हीं परिशिष्टरूपानें दिलेला आहे. [ परिशिष्ट वें पहा ].