पान:रामायणनिरीक्षण.pdf/२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण ३ रें. तरले आहे. बालकांडाचा पहिला सर्ग यानेंच व्यापलेला असून, यास केव्हां केव्हां संस्कृत वाङ्मयामध्यें मूळरामायण असेंहि म्हणतात. राम रावणास मारून अयोध्येत राज्य करीत असतां हैं रचलेले आहे; पण हैं रचलें तेव्हां अझून रामानें अश्वमेधयज्ञ केलेला नव्हता, हें मीं दुस- किडे दाखविले आहे. 2 [ २ ] आग्निवेश्य रामायणहि बऱ्याच प्राचीन रामायणांत मोडतें- अग्निवेश्य अग्निवेश्य हा अगस्ति ऋषीचा शिष्य होता; त्याचें रामा- रामायण यण मला उपलब्ध झालें नाहीं. पण 'रामायणतिलक' नामक टीकेंत रामटीकाकाराने दिलेला उतारा मीं परिशिष्टरूपानें [ परिशिष्ट २ रें पहा ] दिलेला आहे. या उताऱ्यांत ४७ श्लोक असून, ते सर्व अनुष्टुप् छंदांतील आहेत; या रामायणांत तिथींविपयीं वरेच विशेष (Particulars ) आढळतात; असें विशेष नंतर कोणासहि उत्पन्न करण्याचे कारण दिसत नाहीं. रामायणतिलक टीकेंत ज्यांतून उतारा घेतलेला आहे तें आग्निवेश्य रामायण व हल्ली उपलब्ध असलेले अग्निवेश्याच्या नांवावर प्रसिद्ध असलेलें रामायण यांत फरक आहे हें वेबरनें हल्लीं उपलब्ध असलेल्या रामायणाविषयीं दिलेल्या वर्णनावरून कळून येईल. तो आपल्या रामायणावरील निबंधांत या रामायणाविषयीं म्हणतो की, हल्लीं रामचंद्रचरित्रसारम् नांवाचे शार्दूलविक्रीडिताचें एक अग्निवेश्याच्या नांवावर प्रसिद्ध असलेले रामायण मिळत; पण हें अलीकडचें असेल; " रामटीकाकारानें दिलेला उतारा जुन्या अस्सल रामायणांतील [ आभिवेश्य ] दिसतो.. याचा शोध करणें जरूर आहे हे उघड आहे. ८८ ( ३ ) रामाच्या समकालीन ऋषींपैकीं च्यवन भार्गव हा एक