पान:रामायणनिरीक्षण.pdf/२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

रामायणनिरीक्षण. आणून लक्ष्मणास उठविलें, शु० ११ स मातलीनें रामास रथ दिला चैत्र शु० १२ पासून तें वद्य १४ पर्यंत अठरा दिवस रामरावणांचे घनघोर युद्ध होऊन वद्य ३० स रावण बैकुंठास गेला. व वैशाख शुद्ध १ आनंदाचा दिवस. चवदा महिने अठरा दिवस सीतावियोग व चवदा महिने दहा दिवस सीतेला लंकावास, शुद्ध ३ स सीता रामांकीं विराजली. 99 प्रकरण ३ र. ₹. रामचरित्रावरील वाङ्मय रामाचें चरित्र इतके मनोहर आहे की प्रत्येक कवि किंवा लेखक त्यांचें चरित्र गाऊन आपणांस पवित्र करून घेऊं इच्छितो. भगवद्गी- "तेवर टीका करणें ज्याप्रमाणे सर्वांस पचित्र वाटतें, तद्वत्च राम- चरित्रावरहि कांहीं तरी आपण लिहावें, असें बन्याच लोकांस वाटतें. प्राचीन संस्कृत वाङ्मयांत तर रामावर इतके ग्रंथ झाले आहेत कीं कांहीं पुसूं नये. भरतखंडांतील सर्वहि भाषांमधून रामायणे तयार झालेली आहेत इतकेच नव्हे, तर इंग्रजी, इटालियन् वगैरे परभाषां- तूनहि रामायणाचीं भाषांतरे झालेली आहेत. अकबरनें रामायणाचे फारसीत भाषांतर करविलें व रामायणाचें ब्रह्मी लोकांच्या भाषेंताई भाषांतर झालेले आहे. याप्रमाणे हा आर्ष ग्रंथ पृथ्वीच्या पाठीवरील बऱ्याच भाषांमधून प्रसिद्ध आहे. असो. [ १ ] पण या सर्वात अत्यंत प्राचीनतम रामचरित्र म्हणजे का ल्मीकीनें आपल्या रामायणाच्या बालकांडाच्या प्रारंभी दिलेलें होय ! हें रामचरित्र १०० लोकांचे असून नारदानें वाल्मीकीस सांगि नारदाचें रामचरित्र 17 MAR 1990 A