पान:रामायणनिरीक्षण.pdf/२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१८ प्रकरण २ रें. पौष शु० ४ ला बिभीषण भेटले. अष्टमीपासून द्वादशीपर्यंत पांच दिवसांत सेतु बांधला. चतुर्दशीला श्रीराम सिंधुपार झाले. वद्य ३ ते १० पर्यंत लंकापुरवेष्टन. ११ ला रावणाकडून शुक व सारण दूत आले. १ १२ ला पुरद्वार रोधिलें. अमावस्येस मायाशिर करून रावणानें सीतेस फसविण्याचा प्रयत्न केला. माघ शुद्ध १ स अगंद शिष्टाईस गेले, शुद्ध ७ व ८ घोर युद्ध. शुद्ध ११ स अकंपन मारला. शु० १३ स वज्रदंष्ट्राला अंगदानें मारिलें. शु० १५ प्रहस्ताला नीलानें मारिलें. वद्य २ मंदोदरीचा रावणास उपदेश. वद्य ४ रामांनीं रावणाचा मुगुट खालीं पाडिला. वच ९ स कुंभकर्ण लढाईस आला व वद्य १४ ला त्यांचे शिर रामानें उडविलें. फाल्गुन शु० ४ पर्यंत रावणाकडील महोदर, त्रिशिरा वगैरे वीर मारले गेले. शु० ५ ते ७ अतिकाय युद्धांत पडला. शु० ८ ते १२ कुंभ, निकुंभ, जंघ वगैरे मेले. शु० १३ ते वद्य १ पर्यंत चार दिवसांत मकर, अक्ष वगैरे वीर पडले. वध २ इंद्रजित लढाईस आला. वद्य २ मारुतींनीं द्रोणागिरी आणून वानर उठविले, वद्य ८ ते १३ पर्यंत ६ दिवस घोर युद्ध. चैत्रशेवटीं लक्ष्मणानें इंद्रजिताचें शिर उडविलें, पुन्हां सात दिवस घोर युद्ध होऊन लक्ष्मणाला शक्ति लागली. पुन्हां मारुतीनें द्रोणागिरी