पान:रामायणनिरीक्षण.pdf/२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

रामायणनिरीक्षण. वैशाख शु. १ ला वनवासास निघाले. प्रथम तीन दिवस केवळ जलपान. चवथे दिवशीं कांहीं वनफळे लेविलीं. पांचवे दिवश चित्रकटीं पोंचले. त्रैशाख शु. ६.सं भरत आले. नंतर तेथून निघून पंचवटीस साडेबारा वर्षे क्रमिलीं. खरदूषणादि राक्षसांचा संहार, आश्विन वद्य ३० शूर्पणखेस विरूप केलें. पुढे साडेतीन महिन्यांनीं सीताहरण. माघ शु. १४ स सीता गुप्त झाली. माघ वद्य ७ स रावणानें मायावी सीतेचें हरण केलें; हाणजे साडेचवदा महिने सीताविरह. राम सीतेच्या शोधार्थ निघाले. जटा- यूनें शुद्धि सांगितली; कबंधास मारून राम बढरीवनांत शिरले; तेथे शबरीची भक्ति पाहून उच्छिष्ट फळे भक्षिली. फाल्गुनांत पंपाती आले; तेथें तीन महिने श्रीरामांनीं अनुष्ठान केले. जेष्ठ शुद्ध १ पंपासरोवरीं मारुतिराय भेटले. BEARL जेष्ठ शु. ५ स ह्मणजे नागपंचमीस सुग्रीवाची भेट झाली. जेष्ठ शु. ८ वालीला रामांनी मारलें. जेष्ठ शु १३ सुग्रीवाला किष्किंधे वें राज्य दिलें. जेष्ठ शु. १५ श्रीराम माल्यवान् पर्वतावर राहण्यास गेले. वर्षा- काळ गुहेत मुक्काम. श्रावणांत लिंगाचन, भाद्रपदांत पक्ष व० केले. आश्विन शु. १० च्या सुमुहूर्तावर श्रीराम तेथून निघाले. कार्तिक शु० १० ला सुग्रीवाचें सैन्य जमले. कार्तिक व० ७ मारुति सीताशोधनार्थ निघाले. मार्गशीर्ष शु० १० मारुतीनें समुद्रोल्लंघन केलें व झु० १२ ला अशोकवनांत सीतेला भेटले. मार्गशीर्ष वद्य ७ मारुति सैन्यासह श्रीरामचरणापाशीं आले. मार्गशीर्ष व० ३० श्रीराम समुद्रतीरीं आले. २