पान:रामायणनिरीक्षण.pdf/२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

रामायणनिरीक्षण. नायनाटच केला; तेव्हां, या दृष्टीनेंहि रामरावणांच्या युद्धासारिखें युद्ध पूर्वीह कधीं झाले नव्हतें; व [ राक्षसांचा नायनाटच झा- ल्यामुळे व त्यांच्या इतके बळकट शत्रु पुन्हां आर्यांस पुढील इति- हासांत नच आढळल्यामुळे ] हिंदुस्थानांत पुढे तर्से युद्ध हो- ण्याचे कारणच राहिले नाहीं. ह्मणून ते अद्वितीयच होतें; व अ- झूनहि तें अद्वितीयच राहिले आहे. धुळ्याच्या सत्कार्योत्तेजकसभेनें छापलेल्या समर्थप्रताप ' ग्रंथा च्या प्रस्तावनेंत श्रीगिरिधरांच्या अप्रकाशित ग्रंथांविषयीं कांहीं माहिती दिली आहे. त्यांत, अव्दरामायणाच्या १८३ श्लोकांत गिरिधरांनी श्रीरामरायाच्या चरित्राबद्दल कालगणनापर कांहीं मौजेची हकीकत दिली आहे. तीहि आमच्या बांचकासाठी आम्हीं येथें देत आहों; कारण, कित्येक ठिकाणीं तींत आमच्या रोजनिशींत आहे त्यापेक्षां अ- धिक माहिती आहे. गिरिधर यांनी ही माहिती कोठून घेतलेली आहे हैं मला कळले नाहीं. आनंदनाम संवत्सरी चैत्र शुद्ध ९ स, मध्यान्हकाळ अयोध्येस प्रभु रामचंद्र अवतरले. वयाचे ४ थ्या वर्षीपासून विद्याभ्यास. ११ वे वर्षों व्रतबंध. १२ वें वर्षी विश्वामित्राबरोबर गमन. १५ वे वर्षों शिवकार्मुक भांगलें, सीतास्वयंवर झालें; तेव्हां सीता सहा वर्षांची होती. १५ - २७ वर्षे अयोध्येस वास. २७ वे वर्षी वनवासाला प्रारंभ; सीतेचें वय तेव्हां अर्थात् १८ वर्षांचें होतें. २७-४१ वर्षे वनवास.