पान:रामायणनिरीक्षण.pdf/२५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अभिमाय. म्हणजे लक्ष इत्यादि जीं समीकरणें आहेत, त्यांबद्दल मला अत्यंत तिरस्कार वाटतो. केवळ वर्णसादृश्यावरून जर असे म्हणूं लागलों तर Danas वरून दानव Eqyptian वरून चित्पावन ह्या व्युत्प तीहि ग्राह्य ठरतील. पुराणांतील द्वीपांचें वर्णनांतील एक महत्त्वाचा भाग हे राजवाडे प्रभृति संशोधक ( ? ) विसरतात; तो हा की, पौराणिकांचे मतानें जंबुद्वीप व क्षीरसमुद्र ह्याला वेष्टन ( त्यांचे बाजूला नव्हे ) लक्षद्वीप आहे; ह्या लक्षद्वीपाचा विस्तार दोनलक्ष योजनें क जंबुद्रीपाचा एकलक्ष योजन आहे. पक्षाचे वाटेला इक्षुसागर आहे व त्याला बेष्टून शाल्मली द्वीप आहे, इत्यादि हे वर्णन रा. राजवाडे व रा. काळे यांनी शोधलेल्या देशांना कितपत लागू पडतं ह्याचा विचार त्यांनी अवश्य केला पाहिजे. मार्कडेयपुराण ५४ (श्लोक ६–७ ) मध्ये स्पष्टच सांगितलें आहे. 'द्वीपात्तु द्विगुणो द्वीपो जंबु: लक्षोऽथ शाल्मल: । कुशः क्रौंचस्तथा शाकः पुष्करद्वीप एव च ॥ लवणे क्षुसुरासर्पिर्दधिदुग्धजलाब्धिभिः । द्विगुणैद्विगुणैर्वृद्ध्या सर्वतः ष्टिताः ॥' रा. काळे यांनी ज्योतिषी लोकांनी ( आर्यभट, वराहमिहीर जे दोघेहि सहाव्या शतकाचे आरंभी झाले ) नवीन युगकालमान निर्माण केलें असें म्हणून, त्यांचे म्हणण्याचा निकाल केला आहे. यांपेक्षा जास्ती सबळ पुरावा द्यावयास पाहिजे होता. असो. विस्तृत टीका करण्याचें हें स्थळ नव्हे. परिवे ग्रंथांत जरी अनेक दोष वर दाखविल्याप्रमाणें आहेत तरी रा. काळे ह्यांचा प्रयत्न फार स्तुत्य असून त्यांना व त्यांचेसारखे इतरांना उत्तेजन दिले पाहिजे म्हणून व अशा प्रकारची पुस्तकें मराठीत काचेतच होतात, तीं जास्त व्हावीं म्हणून या 'पुराणनिरीक्षण' पुस्तकाला बक्षीस द्यावें असें माझें मत आहे. T