पान:रामायणनिरीक्षण.pdf/२५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२६ रामायणनिरीक्षण. • त्या ठिकाणीं युग याचा अर्थ काय करावयाचा ? ऐतरेय ब्राह्मणां- तील " कलिः शयानो भवति संजिहानस्तु द्वापरः | उत्तिष्ठत्रेता भवति कृतं संपद्यते चरन् ” ह्या ठिकाणी चार युगांची नावे आहेत. ती फाशांच्या दानांची आहेत, पान २५७ वर कलीची ४३२००० वर्षे ( ३६०x१२०० ) केल्याचें खापर आर्यभटाचे माथ फो- अडिलें आहे. ह्या कल्पनेचें बीज ह्मणजे ( मनुष्यांचें वर्ष तो देवांचा • दिवस ) फार जुने आहे. तैतिरीय ब्राह्मण III-१९-२२- मध्ये म्हटले आहे 'एकं वै एतद्देवाना - मह्येत्संवत्सरः ' हल्लींची प्रचलित युगपद्धति व वर्षमानें सिद्धवत् धरू- • नच आर्यभटानें आपला जन्म केव्हां झाला, हें सांगितले. त्यानें नवीन प्रवर्तना केलेली नाहीं. 'षष्ट्यब्दानां षष्टियंदा व्यतीतास्त्रयश्च युगपादाः । व्यधिका विंशतिरव्दास्तदेह मम जन्मनोऽतीताः' असें जें म्हटले आहे त्यांत • युगपद्धति व त्यांची कालमानपद्धती सर्वांना ठाऊक होती असें धरू- नच तो लिहीत आहे, असें व्यक्त होतें. पान २९०-९१ मध्ये आदि • पर्वीतील उताऱ्यावरून पिंगल वगैरे जन्मेजयाचे समकालीन होते

  • असे जें अनुमान काढले आहे तें रा. काळे यांचे विवेचकपद्धतीस
  • शोभत नाहीं. आधीं पिंगल किती झाले कोणास माहीत ? त्यांत

आदिपर्वामध्ये खरोखर इतिहासमाहितीवरून पिंगल जन्मे- जयाचा अध्वर्यु होता म्हणून लिहिलें, की कोणातरी प्राचीन ऋषींचें • नांव घ्यावयाचें म्हणून पिंगलाचे दिलें, हे कशावरून ठरवावयाचें? समग्र ग्रंथांत अत्यंत सदोष भाग म्हणजे माझे मतें पौराणिक भूगोला-

विषयीचीं रा. काळे यांचीं अनुमानें होत. या भागांत रा. राजवाडे

• यांचा शब्द वेदतुल्यच असा भास होतो. Historians' History . of the World बद्दलहि तोच प्रकार आहे. ह्यांतील Pelasge .