पान:रामायणनिरीक्षण.pdf/२५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अभिप्राय. २५. इतिहासपुराण हा समाहारद्वंद्व असेल. नुसतें पुराण जेथे येतें,. त्याठिकाणी ' जाततै एकवचनं १ हा न्याय लागू पडण्यासारखा आहे. उपनिषत्काळी इतिहासग्रंथ जर एकच होता असे मानले तर पुराण अशा नांवाचा एकच ग्रंथ होता असे मानता येईल. माझ्या मतें इतिहासपुराणं हें अंथवाचक नसून विषयवाचक आहे. असो. कांहीं ठिकाणी केवळ नामसदृश्यावरून काढलेलीं अनुमानें चुकीचीं आहेत. उदाहरणार्थ पान १६९ येथें 'भागवतं शास्त्र' ह्मणजे भागवत- पुराण असें धरिलें आहे. त्याला आधार काय ? भागवतपुराणाला शास्त्र कसे झटलें ? ' भागवत पुराण' असे स्पष्ट कां हाटले नाहीं. या ऐवजी ' भागवतं शास्त्रं ' ह्मणजे भगवंतांनी सांगितलें तें. "भा गवतं शास्त्रं ' ह्याणजे भगवद्गीता वगैरे ग्रंथ कां घेऊं नयेत? पुराणां- तील कालगणना अगदीं विश्वसनीय नाहींत. त्यांत घुसवावुसवी इतकी आहे की, त्यावरून सरळ व मनाला पटणारी अशी काल- गणना जमवितां येईल असे माझे मत नाहीं. ज्या विष्णुपुराणाचे " पंचदशोत्तरम् " पाठाबद्दल रा. काळे ह्मणतात कीं, तो लेखक- प्रमाद असून मूळ पाठ पंचाशदुत्तरम् असा वायुपुराणाप्रमा असावा, त्यांत आणखी एक अडचण आहे, तो रा. काळ्यांनी दि-- लेली नाहीं असें वाटतें. विष्णुपुराणाच्या चवथ्या अंशाच्या२१-२४ अध्यायांत वृहद्रथापासून प्रद्योतापर्यंत १००० व पुढें प्रद्योतवंशां- तील पांच राजांची १३८ व शिशुनागवंशांतील १० राजांची ३६२ मिळून महानंदपद्मापर्यंत १५०० वर्षे होतात, ह्मणून सांगितलें आहे. त्याची वाट काय ? कारण, रा. काळे यांच्या मतानें परीक्षिता- पासून नंदापर्यंत ९५०-९५१ च वर्षे होतात. युगशब्दाचे अर्था- बद्दल वाद आहे. ऋग्वेदांतहि 'देवानां प्रथमे युगे' असा उल्लेख येतो. 66 "