पान:रामायणनिरीक्षण.pdf/२५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२४ रामायणनिरीक्षण. मोठें दांडगे आहे असे कोणत्याही वाचकास वाटल्यावांचून राहणार नाहीं. केवळ इतक्या दांडग्या वाचनासाठी सुद्धां त्यांस वक्षिस देणें गैर- बाजवी होणार नाहीं. पुस्तकांत इतकी कांहीं पुष्कळ माहिती त्यांनीं एकत्रित केली आहे की, एखाद्या विवेचकबुद्धिशाली विद्वानानें तिचा उपयोग केला तर पुराण ह्या विषयावर त्यास एक सुंदर ग्रंथ लिहितां येईल; व याप्रमाणें चांगली माहिती गोळा केल्याबद्दल तो विद्वान रा. काळे यांचे कधीहि आभार मानल्याशिवाय रहावयाचा नाहीं. विषयाच्या मांडणीमध्ये सुद्धां रा. काळे यांनी माझ्यामतें बरेंच कौशल्य दाख- विलें आहे. एकंदरींत विचार करितां ह्या पुस्तकास बक्षीस देणें अ- योग्य होईल असे मला वाटत नाहीं. क. पुराणनिरीक्षण " वरील अभिप्राय. " (४) रा. काळे यांचें “ पुराणनिरीक्षण " हे पुस्तक समग्र वाचून पाहिलें. पुस्तकाचा विषय प्राचीन संस्कृत वाङ्मयाचे दृष्टीने फार महत्त्वाचा असून पुस्तकामध्ये १८ पुराणे व त्यांतील विषयासंबंधानें दिलेली माहिती चांगली व उपयुक्त आहे. एकंदर माहितीवरून रा. काळे यांचे वाचन किती विस्तृत आहे याची साग्र कल्पना होते. ऐतिहासिक दृष्टीने प्राचीन ग्रंथांचें विवेचन करण्याची आपणामध्ये प्रवृत्ति कमी आहे. अशा स्थितींत रा. काळे यांच्या ग्रंथाचे अभिनंदन करणें अत्यंत जरूर आहे. आतां या ग्रंथांत पुष्कळ ठिकाणी मतभेद होण्याचा संभव आहे. काही ठिकाणचीं अनुमानें चुकीची आहेत, व अनुमानपद्धतींत दोष आहेत, असें माझें मत आहे. उदाहरणार्थ, पांचवे पानावर व उपनिषदें यांतील उतारे देऊन पुराण एकच होते, असे प्रतिपादन केलेले आहे. पण हे संशयात्मक आहे. 46