पान:रामायणनिरीक्षण.pdf/२५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अभिप्राय. २३ देखील निर्णय रा. काळे यांनी केला आहे. कारण, परीक्षित् हा या युद्धाचे वेळेस जन्मला होता. तेव्हां, चंद्रगुप्ताच्या अभिषेकाच्या ९५१ वर्षे पूर्वी भारत युद्ध झाले असा त्यांचा सिद्धांत आहे. हा सिद्धांत ह्मणजे इतका कांहीं अपूर्व शोध आपण केला असें त्यांस वाटलें आहे कीं, मराठींत त्याचा नुसता ऊहापोह न करितां इंग्रजीमध्यें सुद्धां पुस्तकाचे आरंभी त्याचा अनुवाद त्यांनी केला आहे. याप्रमाणें विवेकबुद्धीस झुगारून देऊन केलेलीं विधानें रा. काळे यांचे पुस्तकांत पुष्कळच आहेत. परंतु वर दिलीं त्यापेक्षा अधिक उदाहरणें देण्याने वाचकांस किंवा श्रोत्यांस कंटाळा मात्र येईल, ह्मणून आणखी देण्याचे भरीस मी पडत नाहीं. या पुस्तकांत दुसरी एक मजेदार गोष्ट दृष्टीस पडते ती अशी कीं, कोणताहि एखादा ग्रंथ शंकराचार्यांचे नांवावर मोडत असल्यास ब्रह्मसूत्रावर शारीरकभाष्य करणारे शंकराचार्य त्यांचाच हा ग्रंथ असें रा. काळे गृहीत करून चालतात, आणि अशा ग्रंथांत एखाद्या पुराणाचा उल्लेख आला असल्यास ते पुराण शंकराचार्योचे पूर्वीच आहे असे विधान करितात. त्याचप्रमाणे कोणत्याही ग्रंथाचे नांवास पुरातन ऋषीचें नांव जोडलें असल्यास त्याच ऋषीचा हा ग्रंथ अशी ते आपली खात्री प्रदर्शित करितात. गर्गसंहिता म्हणजे गर्ग- ऋषीनें केलेला ग्रंथ, जैमिनीयाश्वमेधपर्व जैमिनी ऋषीचा, अतएव हे ग्रंथ इसवी सनाच्या पूर्वीचेच असले पाहिजेत, इत्यादि मोठीं वि- लक्षण विधाने ह्या पुस्तकांत आढळतात. 'पुराणनिरीक्षण ' ह्या पुस्तकांत माझ्या मतें वर सांगितलेल्या प्रकारचे दोष बरेच आहेत. तथापि रा. काळे यांची मेहनत व वाचन 6