पान:रामायणनिरीक्षण.pdf/२४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२२ रामायणनिरीक्षण. व आश्चर्याची गोष्ट ही कीं, 'या पुराणाविषयीं फारच गडबडगुंडा आहे.' (पृष्ठ १०४) व हल्लींच्या स्वरूपांत त्याचें मूलस्वरूप बहुधा लुप्त होऊन त्यांत नव्या मजकुराची जोड झालेली आहे.' (पृष्ठ १०८) असें स्वतः त्यानीं म्हटले आहे. ज्या पुराणामध्यें हरिभक्त कबीर व इंग्लंडांतील पार्लमेन्ट यांचा उल्लेख झाला आहे, अशा पुराणाचाच केवळ सर्वस्वी आधार घेऊन विक्रमानंतर थोडयाच कालानें व्यासोक्त पुराणे एका सूतानें पुनरुरक्त केली, असा ठाम सिद्धांत ठोकून देणे म्हणजे विवेचकबुद्धीच्या शून्यतेची परमावधीच झाली म्हणावयाची. विवेचकबुद्धीच्या अत्यंताभावाचा दुसरा एक अप्रतिम मासला आढ- ळण्यांत येतो तो असा :- वायुपुराणांत एक श्लोक आहे तो असा:- महादेवाभिषेकात्तु जन्म यावत्परीक्षितः । एकवर्षसहस्रं तु ज्ञेयं पंचाशदुत्तरम् । आतां 'एकवर्षसहस्रं पंचाशदुत्तरम्' म्हणजे किती ? एकहजार चन्नास वर्षे हा त्याचा उघड अर्थ दिसतो. परंतु रा. काळे यांचे मतें ९५१ वर्षे असा आहे. एकवर्षसहस्रं ह्मणजे १००१ वर्ष आणि पंचाशदुत्तरम् म्हणजे पन्नास अधिक नव्हे, तर पन्नास उणे ह्मणजे १००१-५० = ९५१ वर्षे असा याचा हिशेब बसतो. अर्थ लाव- ग्याची ही शैली मासलेवाईक आहे. पण इतक्यावरच निभावले नाहीं. "जन्म यावत्परीक्षितः" या वचनांतला परीक्षित कोण आहे हे स्पष्टच आहे. परंतु “ महादेवाभिषेकात्तु" या वाक्यांतला महादेव कोण ? इतर कोणास येथें शंकास्थान बाटेल, पण रा. काळे यांस या बाब- चीत मुळींच संदेह नाहीं. 'महादेव' ह्मणजे अर्थात् मोठे वंशांचा चंद्रगुप्त राजाच होय, अशी त्यांची पक्की खात्री आहे. वायुपुराणांतल्या अशा कपोलकल्पित अर्थाच्या जोरावर भारतयुद्धाच्या काळाचा .