पान:रामायणनिरीक्षण.pdf/२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण २ रें. १५ रह १४ महिने २५ दिवस झाला, हैं या रामायणांवरून कळून येईल. तसेंच, रामरावणयोर्युद्धं रामरावणयोरिव ।। " असे जे आपल्या ग्रंथांत म्हटलेले आढळते, याचें कारणहि आतां ऐतिहासिक दृष्ट्या आपणांस कळून येईल. प्राचीन आर्यांच्या भारत- वर्षांतील इतिहासांत सारखे अठ्ठयाऐंशी दिवस चाललेलें युद्ध रामा- पूर्वी एकहि झालेले नव्हतें - व त्यापुढेंहि असे युद्ध झालें नाहीं ! येवढे मोठें भारतीय युद्ध पण ते सुद्धां सारें अठरा दिवसांतच आटोपलें ! शिवाय तें आयतच आपापसांत झाले; तें राक्षसांसारख्या अनार्य शत्रूशीं झालें नाहीं. पंजाबांतून आर्य लोक दक्षिणेकडे जसजसे येत चालले, त्याप्रमाणे त्यांना यमुना नदीपर्यंत फारसा अनार्य जातीं- कडून अडथळा झाला नाहीं. यमुनेच्या कांठीं मधुवनांत लवण राक्षस, विश्वामित्राच्या आश्रमाजवळ मारीच व सुबाहु राक्षस, वाटेंत ताटका राक्षसीचें वन, बंगाल्यांतील बलि ( हा रा. ब. वैद्यांनीं दाखविल्याप्रमाणे असुर नसून बहुधा राक्षसच असावा ) इत्यादिकांचीं स्थाने पाहिली असतां यमुनेच्या दक्षिणेकडचा बहुतेक सर्व प्रदेश व पूर्वेकडील दक्षिणबंगालप्रांत यांत रामाच्या वेळीं व त्यापूर्वी थोडाकाळ राक्षसांचाच अंमल होता असे कळून येईल. आर्यांना उत्तरबंगाल, नेपाळ, तिरहुत वगैरे प्रांत वामन, भगीरथ वगैरे आर्य शोधकांनी व शूरांनीं रामाच्या पूर्वीच वसाहतीस मोकळे करून ठेविले होते; तथापि आर्यांना या राक्षसांपासून फार त्रास झाला; ते एकीनें व नेटानें आ- यांशी लढत. अशा एकीनें व नेटानें लढणाऱ्या शत्रूशी अझन आर्यांची गांठ पडली नव्हती. सांताहरणार्ने प्रथम आर्योंवा मोर्चा रा- क्षसांच्या मूळ स्थानावरच वळला व त्यांनी त्यांत राक्षसांचा बहुतेक