पान:रामायणनिरीक्षण.pdf/२४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

. अभिप्राय. २१ दतों. या ग्रंथाचा निष्कर्ष रा. काळे ह्यांनी ३१ पृष्ठांवर दिला आहे. पुराणावर किती संस्कार झाले या प्रश्नाचे उत्तर देतांना त्यांनी आपले तीन सिद्धांत वाचकांपुढे मांडले आहेत. त्यापैकी दोन तरी हास्यास्पद आहेत, असे मोठ्या दुःखानें कबूल करावें ·लागतें. पहिला सिद्धांत असा:- व्यासानीं एका पुराणाचीं अठरा पुराणें बनविलीं! त्या वेळच्या पांडवाच्या व श्रीकृष्णाच्या हकीकती त्यांत त्यांनी घालून कालानुगामित्व आणलें. आतां रा. काळे ह्यांनीं व्यास, पांडव व श्रीकृष्ण यांची ऐतिहासिक पुरुषांत गणना केली आहे, व ते सर्व समानकालीन होते असेंहि म्हटले आहे, हे त्यांचें मत विवेचक बुद्धीस कितपत अनुसरून आहे हे मला सांगावयास नकोच. बरें, व्यास हा निर्विवाद ऐतिहासिक पुरुष होता, असे जरी क्षणभर मानिलं, तथापि १८ पुराणांचा कर्ता होता, असे मानण्यास आधार काय ? मनुस्मृतीवरील मेधातिथीची टीका वगैरे अर्वाचीन ग्रंथांशिवाय रा. काळे यांनी दुसरा कोणताहि आधार दिलेला दिसत नाहीं. पुरा- णांवरील संस्कारासंबंधानें 'पुरागनिरीक्षण' ग्रंथकर्त्याचा दुसरा सिद्धांत असाः–कालानुगामित्व आणण्याच्या सद्हेतूनें विक्रमादित्या- नंतर थोड्याच कालानें सर्व पुराणे कोणी एका सूतानें पुनरुक केलीं ( ३१ पृष्ठ ) विक्रमादित्य स्वर्गवासी झाल्यावर शौनकादिक ऋषि सूताकडे धर्म सांगण्याविषयी त्यास प्रश्न करूं लागले. भविष्यपुराणांत आला आहे. तेव्हां, त्यानें त्यांस पांचलक्ष श्लोकात्मक इतिहासपुराणें सांगितलीं ! अठरा पुराणे मिळून चारलक्ष, भारत एक लक्ष मिळून पांचलक्ष संख्या होती असे यावरून वाटतें. (पृष्ठ ३२ - ४) वरील उतायावरून स्पष्ट आहे की या सिद्धांताची सर्व असा प्रसंग मदार रा. काळे यांनी फक्त भविष्यपुराणावर आणून ठेविली आहे, ★ &