पान:रामायणनिरीक्षण.pdf/२४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२० रामायणनिरीक्षण हातोटी हीं कोणासहि मान्य झाल्यावांचून राहणार नाहींत. रा. काळे यांचा ऐतिहासिक चौकसपणा अनुकरणीय आहे; पण तो फार विरळा सांपडतो. असो. रा. काळे यांच्या पुस्तकानें मराठी वाङ्- मयांत एक अमूल्य भर पडली आहे यांत संशय नाहीं; व भारत वर्षाच्या प्राचीन इतिहासावर या पुस्तकानें जे उपकार केले आहेत, ते लक्षांत घेतले असतां रा. काळे यांच्या प्रयत्नांचें कौतुक करावें तितकें थोडेंच असें म्हटल्यावांचून आमच्यानें राहवत नाहीं; म्हणून ह्या पुस्तकास बक्षीस द्यावें अशी मी शिफारस करितों." अ. (२) "ह्या पुस्तकांतील विवेचनाची दिशा फारच विचारणीय आहे. भाषा सुलभ व सुरळीत आहे. अनुमानास पुरावा बराच चांगला आहे. विशेष सिद्धांत जरी सर्वतोपरी ग्राह्य धरण्याबद्दल स्थलविशेषों शंका उत्पन्न होते, तथापि, त्यांना समर्पक उत्तर मिळेपर्यंत ते अग्राह्य तरी मानतां येत नाहीत. सारांश, अशा टीकारूप ग्रंथांना विशेष उत्तेजन देणें हल्लींच्या स्थितींत फार जरूर आहे. असे पुस्तक प्रस्तुत ग्रंथकारासारख्या जुन्या पद्धतीच्या गृहस्थांकडून होणें हें मनाच्या उदात्ततेचें द्योतक आहे. सबब, ह्या पुस्तकास बक्षीस देणे फार योग्य आहे. " व. (३) पुराणनिरीक्षण हा ग्रंथ लिहितांना ग्रंथकर्ते रा. रा. त्र्यंबक गुरुनाथ काळे यांनी जितक्या प्रमाणानें निरनिराळीं पुराणे वाचण्याची मेहनत केली आहे, तितक्याच प्रमाणाने त्यासंबंधीं अनुमानें काढतांना विवेचकबुद्धील ( critical faculty ) फांटा दिला आहे, मोठ्या कष्टानें म्हणावे लागते. बहुतकरून प्रत्येक पानांवर याचा मांसला मिळतो. ते सर्व एकत्र करूं गेल्यास या ग्रंथाएवढाच जवळ जवळ दुसरा ग्रंथ होईल. म्हणून २१३ च पण ठळक उदाहरणे मी असे