पान:रामायणनिरीक्षण.pdf/२४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पुराणनिरीक्षण. पुस्तकावरील डे. व्ह. ट्रॅ. सो. तील परीक्षकांचे अभिप्राय. (१) “ रा. रा. त्र्यंबक गुरुनाथ काळे यांचें “ पुराणनिरीक्षण हैं पुस्तक फार मननीय झालें आहे. यांतील सिद्धांत त्यांनी फार परिश्रमानें व अभ्यासानें स्थापित केलेले आहेत. चार वर्षीचें एक युग ही त्यांची कल्पना जर ठाम ठरेल व तिच्याविरुद्ध कांहीं प्रमाण नसेल, तर यांचें पुस्तक म्हणजे भारत वर्षाच्या इतिहासाचा एक अपूर्व प्रदीप असें म्हणण्यास हरकत नाहीं. ह्या पुस्तकांचे रा. काळे यांनी दोन भाग केले आहेत. पहिल्या भागांत पुराणांचें सामान्य व विशेष स्वरूप कसे आहे, याचें निरू- पण केले आहे. व त्याबद्दल ग्रंथकार म्हणतात त्याप्रमाणें कोणाचा विशेष मतभेद होणें संभवनीय नाहीं. दुसऱ्या भागांत, पुराणांचें महत्त्व, त्यांमध्ये उपलब्ध असलेली परंतु अज्ञान व अनास्था ह्यां- मुळें अनुपयुक्त पडून राहिलेली ऐतिहासिक माहिती व भारत- वर्षाचा ईसवी सनापूर्वी ३०० वर्षांचा इतिहास निश्चित करण्याचे कामीं पुराणांनी बजावलेली कामगिरी यांचें सप्रमाण विवेचन केलेलें आहे; भारतीय युद्ध ईसवी सनापूर्वी १२६३ वर्षाचे सुमारास झाले हा सिद्धांत आजपर्यंतच्या समजुतीहून भिन्न आहे. म्हणून त्याबद्दल मतभेद असणें शक्य आहे; तरी रा. काळे यांची विवेचनपद्धति व अनेक मुद्दे एकत्र करून त्यांपासून सिद्धांत स्थापित करण्याची