पान:रामायणनिरीक्षण.pdf/२४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

रामायणनिरीक्षण. चार प्रकरणांत विषयप्रवेश, रसशास्त्राची उत्पत्ति, रसविद्या व जीव- •न्मुक्ती, धातुवाद खरा आहे, इत्यादि विषयांवर चर्चा केली असून पुढील ३४ प्रकरणांत ३४ ग्रंथांत रसायनसंबंधी काय काय माहिती आहे, प्रत्येक ग्रंथकाराचा काळ, ग्रंथांत अध्याय किती, ग्रंथकाराची गुरुपरंपरा, कोण कोणत्या ग्रंथावरून ग्रंथ तयार केला वगैरे माहिती दिली आहे. प्रकरण २३ त पाग्याविषयी आपल्या प्राचीन ग्रंथांतील माहिती, २४ त रससिद्धि कां होत नाहीं, २५ त पारदाचे प्रकार, रसशास्त्राविषयींचें कर्तव्य, ४३ त पारदभस्म कल्पना, ४४ त रसग्रं- याची मोठी यादी, ४५ उतारे व टिपणें देऊन ग्रंथाची समाप्ति केली आहे. अशा तऱ्हेनें या पुस्तकाचें स्वरूप आहे. धातुवाद खरा आहे या प्रकरणांत प्रत्यक्ष पाहिलेल्या क्रियेचा उल्लेख वैद्य काळे यांनी केलेला आहे. यावरून हलक्या धातूचें सोनें बनवितां येतें यांत बिलकूल शंका नाहीं. आतां ही क्रिया प्रत्येकास -साधेल अशापैकीं कांहीं भाग नाहीं. परंतु प्रयत्न केला असतां ही · गोष्ट साध्य होईल हें खरें. या प्रयत्नांत जेवढे रससेवक असतील त्या प्रत्येकांनी हा ग्रंथ एक वेळ वाचावा व आपल्या संग्रही ठेवावा अशी आम्ही शिफारस करतों. ग्रंथ दोन तीन ठिकाणीं छापला गेल्यामुळे त्यांत चुका वऱ्याच राहिल्या आहेत. हा दोष दुसऱ्या आवृत्तीच्या वेळेस काळे वैद्य काढून • टाकतील असे आम्हास वाटते. या इतिहासात्मक ग्रंथाची किं० १|| रुपाया आहे. वैद्यकपत्रिका, पुणे.