पान:रामायणनिरीक्षण.pdf/२४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

रामायणनिरीक्षण. शास्त्रावर ( यांत धातुविद्या अथवा किमयाहि येते ) संस्कृतमध्ये जे अनेक पूर्ण आणि अपूर्ण ग्रंथ आज उपलब्ध आहेत, त्यांच्या संबंधानें यांत शोधपूर्वक माहिती दिली आहे. रा. काळे यांनी केवळ रसायनशास्त्रावरील ग्रंथांचीच माहिती देऊन स्वस्थ बसतां त्यांच्या कर्त्यांबद्दल आणि कर्त्यांच्या काळाबद्दलहि यांत विद्वत्वसूचक चिकित्सा केली आहे. यामुळे हा ग्रंथ रसायनशास्त्रजिज्ञासूसच नव्हे तर संस्कृत वाङमयाच्या भोक्त्यांसह संग्रहणीय वाटेल. " विविधज्ञानविस्तार, मार्च, १९१३ चा अंक. भारतीय रसायनशास्त्र – ( लेखक - वैद्य त्र्यंबक गुरुनाथ काळे, २०४ सदाशिव पेठ पुणे, किं. १॥ रुपया ) या पुस्तकांत रसवैद्य- कावरील अनेक प्रसिद्ध व अप्रसिद्ध, उपलब्ध व अनुपलब्ध संस्कृत ग्रंथ व ग्रंथकार यांचे कालाचा विचार करून रसशास्त्राचें वाङ्मय फार प्राचीन आहे, असें रा. काळे यांनी सोपपत्तिक व साधार सिद्ध केलें आहे. रसविद्या म्हणजे पाण्याची विद्या इ. स. ४०० च्या सुमारापूर्वी हिंदुस्थानांत नव्हती, असें डॉ. गर्दे यांनी बाग्भटाचे पहिल्या आवृत्तीचे उपोद्धातांत लिहिले होतें. पण रा. काळे यांनी डॉ. गर्दे यांचें हे म्हणणें सप्रमाण खोडून काढल्यामुळे वाभाच्या दुसन्या आवृत्तींत डॉ. गर्दे यांस आपले वरील म्हणणें मागे घ्यावें लागले आहे. रसविद्या ही ग्रीक लोकांपासून किंवा पाश्चिमात्यांपासून आम्ही घेतली नसून पाश्चिमात्यांनींच ती आम्हांपासून घेतली आहे; सिद्ध, नागार्जुन, मांडव्य, व्याडि, चाणक्य इत्यादिकांच्या ग्रंथांवरून व त्यांच्याविषयीं इतर रसग्रंथकारांनी केलेल्या उल्लेखांवरून ही विद्या आमच्या देशांत इ. स. पूर्वी हजारों वर्षीपासून आहे, असें रा. काळे यांनी सप्रमाण दाखविले आहे. आर्यवैद्यकाचा इतिहास या नांवाचे