पान:रामायणनिरीक्षण.pdf/२४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अभिप्राय. १३ काळे यांनी ही अत्यंत महत्त्वाची माहिती नारदपुराणाच्या सूचीवरून व इतर अनेक प्रमाणांवरून दिली आहे. रा. काळ्यांनी दिलेली माहिती फारच महत्वाची आहे व तिजवरून त्यांची शोधकता व्यक्त होते. सारांश, हा भाग माहितीच्या व शोधांच्या जिज्ञासूंस अत्यंत उपयोगी व मनोरंजक आहे यांत शंका नाहीं. " (तिसऱ्या प्रकरणांतील-- माझा भारतीय युद्धाचा काळ, युगमन्वंतराची मूळ कल्पना, व पूर्वकल्पाविषर्यांचा विचार हे भाग रा. ब. वैद्यांना मान्य नसून त्यांवर त्यांनी विरुद्ध टीका केलेली आहे. ( विविधज्ञानविस्तार, नोवेंबर व डिसेंबर १९१२ चे अंक पहा ). यावर मीं आपलें उत्तर इंदुप्रकाश, ता १०-११ व २५ डिसेंबर १९१२ च्या अंकांत व वि. ज्ञा. विस्त्राराच्या १९.१३ च्या अंकांत तरपणें दिलेले आहे.) रा. व. चिंतामणराव वैद्य एम. ए. एल्. एल. बी. रा. काशीनाथ वामन लेले यांनीं धर्माच्या माघ शु. ९ च्या अंकांत पुराणनिरीक्षणाचें निरीक्षण करून पुराणनिरीक्षणकर्त्यांस कांहीं एक समजलें नाहीं व त्यांची सर्व विधानें प्रायः चुकीचीं आहेत असें ठरविलेले आहे. या वाईकर निरीक्षकास प्रभूने केवळ दोपक- दृष्टिच परिपूर्णपणे दिलेली पाहून आम्हांस त्याचें कौतुक वाटलें! प्रभू सर्वही गोष्टींचा संग्राहक आहे! या पलीकडे वाईकर निरीक्षकांस उत्तर देण्याचा आमचा विचार नाहीं; ( विशेषेकरून वरील सर्व अभिप्रायच या निरीक्षकांस उत्तररूप आहेत.) २ भारतीय रसायनशास्त्र. “ पुराणशोधक ग्रंथमालेचा हा दुसरा ग्रंथ वैद्य त्र्यंबक गुरुनाथ काळे ( २०४, सदाशिवपेठ, पुणें) यांनी लिहून प्रसिद्ध केला. याचीं डेमी अष्टपत्री पानें २१६ आणि किं. १॥ रुपया आहे. रसायन-