पान:रामायणनिरीक्षण.pdf/२४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अभिप्राय. १५ प्रकरण लिहून त्यांत चरकादि आयुर्वेदप्रवर्तकांचा काळ इ. स. पूर्वी २००० वर्षे असावा असे अनुमान रा. काळे यांनी काढिले आहे. पण हें अनुमान रामायणाचे काळावर अवलंबून असल्यामुळे तें ठाम आहे असें ह्मणतां येत नाहीं. रा. काळे यांच्या या ग्रंथाने आपल्या इकडे रसवैद्यकावर किती ग्रंथ झाले व स्यांचें स्वरूप काय आहे, याची कल्पना वाचकांस स्पष्टपणें येईल. कांहीं अप्रसिद्ध ग्रंथांतील आवश्यक पाठ पुस्तकांत असल्यामुळे त्यांचा वैद्यकासही बराच उपयोग होईल यांत शंका नाहीं. पण 'भारतीय रसायनशास्त्र' या नांवावरून या पुस्तकांत आप- ल्या इकडील रसायनशास्त्राची प्रगति कशी व कोठपर्यंत झाली होती, आधुनिक पाश्चात्य रसायनशास्त्रांत व आपल्या इकडील रसायनशा- स्त्रांत कितपत व कसा काय फरक आहे, इत्यादि गोष्टींचा विचार या पुस्तकांत असेल अशी जर कोणी कल्पना करील ( अशी कल्पना होणें अगदीं स्वाभाविक आहे ) तर मात्र त्याची निराशा झाल्या- वांचून राहणार नाहीं. रा. काळे यांनीं रसायन हा शब्द ' देहसिद्धि' ( शरीराचें आरोग्य ) या अर्थानेंच योजिलेला दिसतो. या पुस्तकां- तील माहितीनें रसायनशास्त्रावरील आणखी ग्रंथ शोधून काढण्याचें काम उपयोग होईल असे त्यांनी पुस्तकच्या प्रारंभी म्हटले आहे व तें पुष्कळ अंशीं खरें आहे. पण ' भारतीय रसायनशास्त्र' असें असें मोठें नांव या पुस्तकास देण्याऐवजीं 'रसवैद्यकावरील ग्रंथ ' निदान ' रसायनशास्त्राचें संस्कृत वाङ्मय, हें नांव दिले असते तर वाच कांचा गैरसमज झाला नसतां धातुवाद ऊर्फ किमया खरी आहे असे एक बैराग्याने दाखविलेल्या प्रत्यक्ष अनुभवावरून काळे लिहितात. यास फार तर खरोखर घडलेला एक चमत्कार असे 6