पान:रामायणनिरीक्षण.pdf/२३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

रामायणनिरीक्षण. सूची धमक नाहीं व त्याला वेळ व तशी इच्छाहि नाहीं. " चहूं वेदीं जाण । साही शास्त्री कारण । अठराही पुराणें हरिसी गाती " या- स्तव श्रीहरीच्या कृपाप्रसादाचीं- निदान - इच्छा करणारा करी नम्र मुमुक्षु विद्वानांना सादर व सप्रेम नमन करून विश्राम पावतो. पुरा- णनिरीक्षण, किं. रु. १८८ व भारतीय रसायनशास्त्र किं. १८८ हे दोन्ही ग्रंथ ग्रंथकर्त्याकडे ( पुणे येथें सदाशिव पेठ, नं० २०४ या पत्त्यावर ) मागवावेत. रा. काळे यांचे दीर्घ परिश्रम, बहुश्रुतपणा व विद्वता हे गुण प्रशंसनीय असून वरील ग्रंथ आश्रया आहेत इतकें सांगून संपवितों. मुमुक्षु - ता. ३|४|१९१३- पुराणनिरीक्षण:-- हा सुमारे ३५० पानांचा महत्त्वाचा ग्रंथ प्रसिद्ध प्राचीन ग्रंथसंशोधक व माजी समालोचक मासिकपुस्तकाचे संपादक रा. रा. त्र्यंबक गुरुनाथ काळे यांनी लिहिला. हिंदुधर्मग्रंथां- पैकी अठराहि पुराणांची सांगोपांग माहिती आधारपूर्वक आणि विस्त रशः या ग्रंथांत दिली असून ती देतांना त्या विषयावरील आजप- र्यंतच्या सर्व ग्रंथांचा उपयोग रा. काळे यांनी केला आहे. पुराणांचा काल, त्यांतील कथा, त्यांची भाषा, त्यांचें कर्तृत्व इत्यादि सर्व मह त्त्वाच्या विषयांचें विवेचन रा. काळे यांनी बऱ्याच समाधानकारक रोतीनें केलें असल्यामुळें “पुराणे वाचण्यापूर्वी हें पुस्तक वाचलेले असल्यास पुराणांविषयीं अधिक विस्तृत व चांगली माहिती मिळेल.. पुराणांविषयीं इतकी माहिती एके ठिकाणी कोणत्याच भाषेतील पुस्त- कांत नाहीं " असें जें त्यांनी प्रस्तावनेत म्हटले आहे, ते पुष्कळ अंशीं खरं आहे असे आम्हांस वाटतं. नाटके आणि कादंबऱ्या यांच्या चालू काळांत असले महत्त्वाचे आणि शोधपूर्वक लिहिलेले ग्रंथ क्वचि- तूच बाहेर पडतात, हे लक्षांत घेऊन सर्व साक्षर महाराष्ट्रीयांनीं असे