पान:रामायणनिरीक्षण.pdf/२३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अभिप्राय, ग्रंथ लिहिणाऱ्या लोकांस शक्य तें उत्तेजन अवश्य दिले पाहिजे. ग्रंथाची किंमत १॥ रु. असून तो ग्रंथकर्त्याकडे ( नं. २०४ सदाशिव पेठे, पुणे शहर.) मिळेल. इंदुप्रकाश, ता. २ सप्टेंबर १९१२- 'पुराणनिरीक्षण' पुस्तक वाचून फार आनंद झाला. हाती घेतलेल्या विषयाचा व्यासंग उत्तम करून परिश्रमानें सूचक अशीं विधानें केले- लीं आहेत. भागवताबद्दल अखेर निर्णय झाला असे कदाचित् आप- लहि मत नसेलच. तिसऱ्या प्रकरणांतील आपण अर्थ केलेला आहे, त्याहून 'आरभ्य भवतो जन्म' या श्लोकाचा जो 'तारानाथ तर्कचाचस्पति' यांनी आपल्या 'सिद्धांतकौमुदी' ग्रंथाच्या पूर्वार्धीत निराळा केलेला आहे; आपला अर्थ विचार करण्यासारखा आहे. 6 आपले परिश्रम पाहून कौतुक वाटतें; असेंच आपणांस यज्ञ येऊन मराठींत उत्तम ग्रंथांची अभिवृद्धि होवो अशी परमेश्वरास प्रार्थना आहे. रा. गोविंद काशीनाथ चांदोरकर बी. ए, माजी 'प्रभात' मा. पु. चे संपादक. धुळे. “रा. रा. त्र्यंबक गुरुनाथ काळे यांची शोधकता व व्यासंग कर- ण्याची पद्धति महशूर असून त्या गुणांस साजेल अशा प्रकारची माहिती पुराणनिरीक्षण या पुस्तकांत वाचकांच्या समोर त्यांनी ठेविली आहे हे सांगणे नको. पहिल्या प्रकरणांत पुराणांविषयीं सा- मान्य माहिती रा. काळे यांनी दिली असून इतिहास, पुराण, ख्यान, उपाख्यान, कल्पशुद्धि या शब्दांनी कोणत्या ग्रंथाचा व विष- यांचा बोध होतो हे त्यांनी चांगल्या रीतीनें व साधार दाखविलें आहे. x X वैदिक काळापासून पुराणांचें रूपांतर कसक आ-