पान:रामायणनिरीक्षण.pdf/२३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अभिमाय. जुमानतां विद्यार्जनांत व विद्यादानांत आयुष्य कंठण्याची त्यांची तयारी हीं पाहून आह्मांस स्मरतें. रा. काळे यांनी भारतीय रसायनशास्त्र म्हणून रसायनशास्त्रावरही एक ग्रंथ प्रसिद्ध केलेला आमचेकडे आला आहे. आम्हांला त्या विषयाचें ज्ञान नाहीं, पण त्यांत भारतीय रसायनशास्त्राचा उगम रामायणाच्या वेळेपासून आहे हें त्यांनी दाखविलें असून ऋष्यशृंग, शाकल, नागार्जुन, रुद्रयामल इ. ग्रंथांविषयी उपलब्ध माहिती प्रस्तुत ग्रंथांत दिली आहे, ती या विष याच्या अभ्यासी पुरुषांस मोठी उपयोगाची वाटेल यांत शंका नाहीं, पुराणनिरीक्षण ग्रंथ सामान्य वाचकांसहि मोठा मनोरंजक वाटेल यांत शंका नाहीं, या ग्रंथाच्या पूर्वार्धीत पुराण म्हणजे काय, तें कित प्राचीन आहे, व्यासांच्या पूर्वीचें एक पुराणांचा पूर्वग्रंथांतून एकात्मक उल्लेख, पुराणांचा व्यासोत्तर ग्रंथांतून अनेकात्मक उल्लेख, पुराणांचा उद्देश व हेतु, पुराणांचें सद्यःस्वरूप, पुराणवाचनाची फल- श्रुति इ. प्रश्नांची - अवतरणांसह - मुद्देसूद चर्चा केली असून पुढें अठराहि पुराणांपैकी प्रत्येकाचें लक्षण व सूची दिली आहे व त्याग- माणे कोणते भाग उपलब्ध आहेत व कोणते अनुपलब्ध आहेत इ. विषयांचें सूक्ष्म विवेचन केले आहे. हा पूर्वार्ध नव्या जुन्या विचा- रांच्या लोकांना मान्य होण्यासारखा आहे. उत्तरार्धीत, पौराणिक काल- गणना, पौराणिक इतिहास, पौराणिक भूगोल व पूर्वकल्पाचा इति- हास या विषयांचा ऊहापोह केलेला असून त्यांतील काही मतें अग नवीन आहेत. यावद्दल रा. व. चिंतामणराव वैद्य व रा. काळे यां- च्यांत इंदुप्रकाश व वि. ज्ञा. विस्तार यांतून वादविवादही चाल- लेला आहे. अनभ्यासास्तव आह्मांस त्याबद्दल कांहींच मत देतां येत नाहीं. असल्या विद्वत प्रबुर विषयांत व वादांत शिरण्याची मुमु-