पान:रामायणनिरीक्षण.pdf/२३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६ रामायणनिरीक्षण. पुस्तकाचे एकंदर दोन भाग असून त्यांत अनुक्रमें दोन व चार अशीं एकंदर सहा प्रकरणे आहेत. पद्मोगणती राजांच्या कथा अस लें व अनेक कवींनी लिहिलेले असें एक पुराण व्यासांच्या पूर्वी होतें, ल्यांतूनच व्यासांनीं १८ पुराणांच्या संहिता केल्या, मूळ पुरा व्यासांच्या वेळेपासून तों इ. स. पूर्वी सुमारे १०० पर्यंत प्रचलित असून विक्रमाच्या वेळीं तीं अर्वाचीन भाषेन पुनरुक्त झाली, आदि- पुराणे पूर्वी प्रत्येक १२ हजारांची होती, ती पुढे आख्यानांनी व उपाख्यानांनीं वृद्धेि पावलीं, व्यासांपासून विक्रमाच्या वेळेपर्यंत जम- लेली पुराणसामग्री ग्रथित होऊन पुराणांची ४ लक्ष संख्या झाली, वगैरे माहिती प्राचीन ग्रंथांतील प्रमाणांवरून दिली असून भारतीय युद्धाचा काळहि इ. स. पूर्वी १२६३ हा ठरविला आहे. अठराहि पुराणांपैकी हल्लीं कोणकोणते भाग उपलब्ध आहेत व कोणते अनुपलब्ध आहेत याविषयहि पुस्तकांत सविस्तर माहिती दिली आहे. प्रत्येक पुराणांत काय काय विषय आलेले आहेत हे कळण्यासाठी नारद-- पुराणोक्त सूचीहि दिली आहे. उत्तरार्धीत भारतीय कालगणना व इतिहास यांची इ. स. पूर्वी ३१०२ पासून संगति लावली असून, गौराणिक भूगोलाचीहि रा. राजवाडे यांच्या लेखावरून पांचव्या प्रकरणांत माहिती दिली आहे; पुस्तकांत ग्रंथकर्त्यांनी स्थापित केलेल्या मुधासंबंधाने कोणाचा कदाचित् मतभेद झाला तरी, वैद्य त्र्यंबक गुरुनाथ काळे यांच्या पुराणनिरीक्षणाच्या परिश्रमांची प्रशंसा करणे जरूर आहे. पुराणांच्या संबंधानें जेथे म्हणून माहिती उपलब्ध होईल तेथून तेथून ती मिळवून त्यावर त्यांनी आपले सिद्धान्त प्रतिपादन केलेले आहेत, पुराणनिरीक्षणाच्या दृष्टीने हा ग्रंथ अवश्य संग्राह्य